W, W, 1, 1, W W...! पहिली ओव्हर अन् 4 विकेट्स, 'या' गोलंदाजानं केला वर्ल्ड रेकॉर्ड

Video: टी20 ब्लास्टमध्ये डावाच्या पहिल्याच षटकात 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम पाहायला मिळाला आहे.
Shaheen Afridi
Shaheen AfridiDainik Gomantak
Published on
Updated on

Shaheen Afridi picked 4 Wickets In 1st Over of a T20 Match: इंग्लंडमध्ये सध्या टी20 ब्लास्ट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शाहिन आफ्रिदीने मोठा पराक्रम केला आहे. शुक्रवारी नॉटिंगघमशायर विरुद्ध बर्मिंगघम बियर्स संघात सामना झाला. या सामन्यात आफ्रिदीने पहिल्या डावात 4 विकेट्स घेण्याचा विक्रम केला.

या सामन्यात नॉटिंगघमशायरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वबाद 168 धावा करत बर्मिंगघम बियर्ससमोर 169 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बर्मिंगघमची सुरुवात अत्यंत खराब झाली. नॉटिंगघमशायरकडून शाहिन आफ्रिदीने पहिल्याच षटकात चार विकेट्स घेत बर्मिंगघमला मोठा दणका दिला.

Shaheen Afridi
IPL 2023:W, W, W, W...! चार चेंडूत चार विकेट्स अन् हार्दिकच्या गुजरातचा लखनऊवर रोमांचक विजय

अशा घेतल्या शाहिनने विकेट्स

शाहिनने गोलंदाजी केलेल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू वाईड गेला, ज्यावर ५ धावा बर्मिंगघमला मिळाल्या. त्यानंतर दुसरा चेंडू त्याने इनस्विंग करत यॉर्कर टाकला, ज्यावर ऍलेक्स डेव्हिसकडे काहीही उत्तर नव्हते. या चेंडूवर तो पायचीत झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर शाहिनने ख्रिस बेंजामिनला त्रिफळाचीत केले. त्यामुळे त्याला हॅट्रिकची संधी होती.

मात्र, तिसऱ्या चेंडूवर डॅन मुसलीने एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवरही रॉब याट्सने एकेरी धाव काढली. मात्र, पाचव्या चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर आलेला डॅन या चेंडूवर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ऑली स्टोनकडे झेल देत 1 धावेवर बाद झाला.

त्याच्या पुढच्याच चेंडूवर शाहिनने एडवर्ड बेनार्डला त्रिफळाचीत करत माघारी धाडले. त्यामुळे पुन्हा एकदा शाहिनकडे हॅट्रिकची संधी होती. पण पुढच्या तिन्ही षटकात त्याला विकेट्स घेता आल्या नाहीत. शाहिनने 4 षटकात एकूण 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

Shaheen Afridi
IPL 2023: 6,6,6... टीम डेव्हिडने मुंबईला मिळवून दिला जबरदस्त विजय! राजस्थानच्या जयस्वालचे शतक व्यर्थ

शाहिनचा विक्रम

दरम्यान, शाहिन टी20 क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच षटकात चार विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम कोणालाही करता आला नव्हता.

...तरीही नॉटिंगघमशायरचा पराभव

शाहिनने पहिल्याच षटकात 4 विकेट्स घेतल्यानंतरही नॉटिंगघमशायरला पराभवाला सामोरे जावे लागले. बर्मिंगघमकडून रॉब येट्सने 46 चेंडूत 65 धावांची खेळी केली, तर जेकब बेथेल आणि जेक लिंटॉट यांनी प्रत्येती 27 धावांची खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे बर्मिंगघमने 19.1 षटकात 8 बाद 172 धावा करत 2 विकेट्सने विजय मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com