Team India
Team IndiaDainik Gomantak

IND vs BAN: टीम इंडियाच्या तोंडचा घास बांगलादेशने पळवला, तिसरा सामना अखेरच्या क्षणी 'टाय'

IND vs BAN: भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेवर कब्जा करण्यास मुकला.

IND vs BAN: भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेवर कब्जा करण्यास मुकला. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेळला जात होता.

नाणेफेक जिंकल्यानंतर बांगलादेशने 50 षटकांत 4 गडी गमावून 225 धावा केल्या. त्याचवेळी टीम इंडियाचा डावही 49.3 षटकात 225 धावांवर आटोपला. स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी अर्धशतकी खेळी खेळली.

वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. बांगलादेशने (Bangladesh) पहिला सामना 40 आणि भारताने (India) दुसरा सामना 108 धावांनी जिंकला. हरलीनला सामनावीर आणि फरगाना हकला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

दरम्यान, तिसऱ्या वनडेत भारतीय डावाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात शफाली वर्मा (4) पॅव्हेलियनमध्ये परतली. पाचव्या षटकात यास्तिका भाटियाची (5) विकेट गेली. यानंतर सलामीवीर मानधना आणि हरलीनने जबाबदारी स्वीकारली.

दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. मनधाना 29 व्या षटकात बाद झाली. तिने 85 चेंडूंत 5 चौकारांसह 59 धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौर (14) जास्त वेळ क्रिझवर टिकू शकली नाही.

पाचवी खेळाडू म्हणून हरलीनने 42 व्या षटकात आपली विकेट गमावली. तिने 108 चेंडूत 9 चौकारांसह 77 धावा केल्या. परंतु ती रनआउट झाली.

Team India
IND A vs BAN A: भारत-बांगलादेशी क्रिकेटपटूंमध्ये भर मैदानात जुंपला वाद, Video व्हायरल

दुसरीकडे, हरलीन बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्सने संयमी फलंदाजी केली मात्र तिला इतर सहा जणांची साथ मिळू शकली नाही. अखेरीस 34 धावा काढून संघाने 6 विकेट गमावल्या यावरुन भारताच्या खराब स्थितीचा अंदाज लावता येतो.

अमनजोत कौरने 10, दीप्ती शर्माने 1 आणि मेघना सिंगने 6 धावांचे योगदान दिले. तर स्नेह राणा आणि देविका वैद्य यांना खातेही उघडता आले नाही. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर मेघनाने तर दुसऱ्या चेंडूवर जेमिमाने एक धाव काढली.

मात्र, तिसर्‍या चेंडूवर मेघना बाद झाल्याने भारतीय संघ खचला. जेमिमाने 45 चेंडूत 33 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने 3 तर मारुफा अख्तरने 2 बळी घेतले. सुलताना खातून, राबिया खान आणि फहिमा खातून यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Team India
IND vs BAN: भारताच्या मुली चमकल्या, दुसरा T20 सामना जिंकून मालिकेवर केला कब्जा; शफालीचं ते अखेरचं षटक...

तत्पूर्वी, यजमान बांगलादेशने डावाची सुरुवात शानदार केली. शमीमा सुलताना आणि फरगाना हक यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. स्नेह राणाने 27व्या षटकात सुलतानाला बाद करुन ही भागीदारी मोडली. तिने 78 चेंडूत 52 धावा केल्या. तिने 5 चौकार मारले.

फरगानाने कर्णधार निगारा सुलतानासह दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. निगारने 36 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. तीही राणाची शिकार झाली. देविकाने रितू मोनी (21) हिला आपल्या जाळ्यात अडकवले. 50 व्या षटकात फरगाना धावबाद झाली.

तिने 160 चेंडूत 7 चौकारांसह 107 धावांची तूफानी खेळी खेळली. वनडेमध्ये शतक झळकावणारी ती बांगलादेशची पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. शोभना मोस्तारी 22 चेंडूत 23 धावा जोडून नाबाद परतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com