ISL football Dainik Gomantak
क्रीडा

ISL football: ओडिशा एफसीवर दोन गोलने मात

आयएसएल स्पर्धेत पहिला वैयक्तिक गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना केरळा ब्लास्टर्सचा हरमनज्योत खब्रा.

दैनिक गोमन्तक

पणजी: केरळा ब्लास्टर्सने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या (Football) आठव्या मोसमात अव्वल स्थान प्राप्त करताना ओडिशा एफसीवर 2-0 फरकाने मात केली. वास्को येथील टिळक मैदानावर बुधवारी झालेल्या लढतीतील दोन्ही गोल पूर्वार्धात झाले.

सलग 10 सामने अपराजित असलेल्या केरळा ब्लास्टर्सचा हा एकूण 11 लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 20 गुण झाले असून त्यांनी 10 गुण असलेल्या जमशेदपूर एफसीला दुसऱ्या स्थानी लोटले.

10 लढतीत एकही पराभव न पत्करता इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने प्रत्येकी 5 विजय व बरोबरी नोंदविल्या आहेत. ओडिशा एफसीला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 10 लढतीनंतर किको रमिरेझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 13 गुण व आठवा क्रमांक कायम राहिला.

निशू कुमार याने 28व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सचे गोलखाते उघडल्यानंतर हरमनज्योत खब्रा याने हेडिंगद्वारे 40व्या मिनिटास संघाची आघाडी वाढविली. केरळा ब्लास्टर्सचा हा ओडिशावरील सलग दुसरा विजय ठरला. पहिल्या टप्प्यातही केरळच्या संघाने 2-1 फरकाने विजय नोंदविला होता.

केरळा ब्लास्टर्सचे वर्चस्व

पूर्वार्धातील खेळात दोन गोल नोंदवून केरळा ब्लास्टर्सने वर्चस्व प्रस्थापित केले. नियमित कर्णधार जेसेल कार्नेरो दुखापतग्रस्त असल्याने संघात पुनरागमन केलेला बचावपटू निशू कुमार याने केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. एड्रियन लूना याच्या असिस्टवर 24 वर्षीय निशूने दूरवरून सणसणीत फटक्यावर ओडिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याला हतबल ठरविले.

विश्रांतीला पाच मिनिटे असताना हरमनज्योत खब्रा याने आयएसएल कारकिर्दीतील पहिला गोल केला. त्यामुळे केरळच्या संघापाशी दोन गोलची आघाडी जमा झाली. लूना याच्या कॉर्नर फटक्यावर खब्रा याचे हेडिंग भेदक ठरले. या 33 वर्षीय खेळाडूचा 112 आयएसएल सामन्यातील हा पहिलाच गोल ठरला.

प्ले-मेकर लूना प्रभावी

केरळा ब्लास्टर्सचा प्ले-मेकर मध्यरक्षक एड्रियन लूना याने पुन्हा एकदा प्रभावी खेळ करून छाप पाडली. ओडिशाविरुद्ध दोन्ही गोल त्याच्या असिस्टवर झाले. उरुग्वेच्या या 29 वर्षीय खेळाडूचा आयएसएलमधील पहिलाच मोसम आहे. त्याने 11 सामन्यात 3 असिस्ट नोंदवून मुंबई सिटीच्या अहमद जाहू व जमशेदपूरचा ग्रेग स्टुअर्ट यांना गाठले आहे. शिवाय लूना याने 2 गोलही केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT