Hardik Pandya
Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: हार्दिकने WI मध्ये रचला इतिहास, T20 मध्ये असे करणारा ठरला पहिला खेळाडू

दैनिक गोमन्तक

Ind vs WI 3rd T20, Hardik Pandya: टीम इंडियाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2022 पासून पांड्याची विक्रमी कामगिरी आपण पाहत आहोत. यातच हार्दिकने मंगळवारी (2 ऑगस्ट) सेंट किट्समधील वॉर्नर पार्क येथे विंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर केला. या सामन्यात त्याने असा पराक्रम केला जो यापूर्वी कोणताही भारतीय खेळाडू करु शकला नव्हता.

हार्दिक पांड्याने इतिहास रचला

हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 4 षटके टाकली. ज्यामध्ये त्याने 4.75 च्या इकॉनॉमीमध्ये फक्त 19 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. हार्दिकने ही विकेट मिळवताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले आणि सर्वोत्कृष्ट विक्रमही आपल्या नावावर केला. T20 क्रिकेटमध्ये 500 हून अधिक धावा आणि 50 बळी घेणारा हार्दिक पांड्या हा भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारची खास कामगिरी करणारा हार्दिक हा जगातील 9 वा खेळाडू ठरला आहे.

T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 50 विकेट्स पूर्ण करणारा 6वा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी ही कामगिरी केली आहे. दुसरीकडे, जर आपण भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बद्दल बोललो तर तो युजवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) आहे. युजवेंद्र चहलने भारताकडून 60 टी-20 सामन्यात 79 विकेट घेतल्या आहेत.

पंड्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट

हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप 2021 पासून टीम इंडियातून बाहेर पडला होता, परंतु तो पुन्हा एकदा टीम इंडियाचा (Team India) महत्त्वाचा भाग बनला आहे. हार्दिक पांड्याने आतापर्यंत भारतासाठी 66 टी-20 सामन्यांमध्ये 23.03 च्या सरासरीने 806 धावा केल्या आहेत. आणि 50 बळी घेतले आहेत. हार्दिक पांड्याने 66 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यात त्याने 1386 धावा आणि 63 विकेट घेतल्या आहेत. पंड्याने 11 कसोटी सामन्यांमध्ये 532 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Alcohol Seized : महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची दारू पकडली

Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

SCROLL FOR NEXT