Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, Qualifier: मुंबईकडून गुजरातविरुद्ध 12 नाही, तर 13 खेळाडू उतरले मैदानात, कसं ते घ्या जाणून

IPL 2023 क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून 13 खेळाडू खेळले.

Pranali Kodre

Why 13 players played for Mumbai Indians against Gujarat Titans: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शुक्रवारी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सविरुद्ध 62 धावांनी पराभूत केले. दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून 13 खेळाडू खेळताना दिसले.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. होता. त्यावेळी ईशान किशन, कर्णधार रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल हे 11 खेळाडू मैदानात उतरले होते.

पण नंतर मुंबईने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार नेहल वढेराला खेळवले होते. तसेच फलंदाजी करताना सहाव्या क्रमांकावर विष्णू विनोद दुखापतग्रस्त ईशान किशन ऐवजी कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरला. त्यामुळे तो आयपीएलमध्ये कन्कशन सब्स्टिट्यूट होणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

यष्टीरक्षक ईशान किशनला मुंबईच्या क्षेत्ररक्षणावेळी डोळ्याला दुखापत झाली होती. ही घटना सामन्याच्या 16 व्या षटकादरम्यान घडली. त्यावेळी मुंबईचाच गोलंदाज ख्रिस जॉर्डन आणि ईशान यांची धडक झाली.

त्यामुळे जॉर्डनच्या डाव्या हाताचा कोपरा त्याच्या डोळ्याला लागला. त्यामुळे ईशानला मैदानाबाहेरही जावे लागले. त्याच्या ऐवजी शेवटच्या षटकांमध्ये विष्णू विनोदनेच यष्टीरक्षण केले होते. तसेच नंतर तो फलंदाजीलाही उतरला. त्यामुळे मुंबईकडून या सामन्यात एकूण 13 खेळाडू खेळताना दिसले.

मुंबईचे भंगले स्वप्न

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून शुभमन गिलने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. गुजरातकडून गिलने साई सुदर्शनबरोबर 138 धावांची भागीदारी केली. सुदर्शन 43 धावा करून रिटायर्ड आऊट झाला.

त्यानंतर हार्दिक पंड्याने नाबाद 28 धावांची खेळी केली, तर राशीद खान 5 धावांवर नाबाद राहिला. तसेच वृद्धिमान साहाने 18 धावांची खेळी केली. त्यामुळे गुजरातने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 233 धावा केल्या.

त्यानंतर 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 18.2 षटकात सर्वबाद 171 धावाच करता आल्या.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 38 चेंडूत 61 धावांची खेळी केली. तसेच तिलक वर्माने 43 आणि कॅमेरॉन ग्रीनने 30 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त मुंबईकडून कोणाला दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sankashti Horoscope: गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व कष्ट, 'या' राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: केरये-खांडेपार अपघातात स्कुटर चालक जखमी

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT