IPL 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांमध्ये धक्काबुक्की! Video ने उडवली खळबळ

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये IPL 2023 मधील क्वालिफायर-2 आणि फायनल सामना होणार असून त्याआधी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Chaos among fans while collecting tickets at Narendra Modi Cricket Stadium in Ahmedabad
Chaos among fans while collecting tickets at Narendra Modi Cricket Stadium in AhmedabadDainik Gomantak
Published on
Updated on

Chaos among fans while collecting tickets at Narendra Modi Cricket Stadium in Ahmedabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अखेरचा टप्पा सुरू आहे. यास्पर्धत 26 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात क्वालिफायर २ सामना खेळवला जाणार आहे, तसचे 28 मे रोजी अंतिम सामना पार पडणार आहे. हे दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.

दरम्यान, या सामन्यांच्या पूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेरील असल्याचा आणि दुसऱ्या क्वालिफायर सामन्यापूर्वीचा असल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे.

तसेच सोशल मीडियावर काही जणांनी केलेल्या दाव्यानुसार गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर तिकिट घेण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती. त्यावेळी चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली आहे.

Chaos among fans while collecting tickets at Narendra Modi Cricket Stadium in Ahmedabad
IPL 2023 फायनलपूर्वी धोनीने घेतली पथिरानाच्या कुटुंबियांची भेट, 'मल्ली सुरक्षित हातात...'

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमचे एक गेट दिसत असून त्यावर आयपीएल 2023 चे बॅनरही लागलेले दिसत आहेत. तसेच गेटच्या आसपास माणसांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीत चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की होतानाही दिसत आहे.

दरम्यान हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे, याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पण अनेक युजर्सने केलेल्या दाव्यानुसार 25 मे 2023 रोजीचा हा व्हिडिओ आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की नियमानुसार ऑनलाईन तिकिट्स बुक केल्यानंतरही ग्राहकांना स्टेडियममध्ये प्रवेशासाठी प्रिंट केलेले तिकिट्स स्टेडियममधून घ्यावे लागतात.

Chaos among fans while collecting tickets at Narendra Modi Cricket Stadium in Ahmedabad
IPL 2023 Qualifier 2: मुंबईला मात देणं गुजरातसाठी सोपं नाही, रेकॉर्ड बघून पांड्याचं वाढणार टेंशन!

तीन संघ अद्यापही विजेतेपदाच्या शर्यतीत

सध्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने स्थान निश्चित केले आहे. त्यांनी पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

त्यामुळे आता गुजरात टायटन्सला दुसरा क्वालिफायर सामना खेळायचा आहे. हा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. मुंबईने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत करत दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला होता.

त्यामुळे आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबई आणि गुजरात यांच्यातील विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्याच चेन्नईविरुद्ध खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com