Gokulam beat Kerala Churchill Brothers in I-League Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

गोकुळम केरळास संघाने चर्चिल ब्रदर्सला दिली कडवी झुंज

आय-लीग ः गतविजेते सलग 19, तर गोव्यातील संघ आठ लढती अपराजित

दैनिक गोमन्तक

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सध्या अव्वल स्थानी असलेल्या गतविजेत्या गोकुळम केरळा संघाला गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने शनिवारी 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. विजेतेपद फेरीतील सामना कोलकाता येथील कल्याणी स्टेडियमवर झाला.

गोकुळम केरळा संघ यंदा स्पर्धेत सलग 14, तर एकंदरीत 19 सामने अपराजित आहे. विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या या संघाने यावेळच्या स्पर्धेत 10 विजय नोंदवले असून चार लढती बरोबरीत राखल्या आहेत. चर्चिल ब्रदर्सने बरोबरीत रोखले, तरी 34 गुणांसह त्यांचे अग्रस्थान कायम राहिले.

यंदा स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स संघ आता आठ सामने अपराजित आहे. सलग पाच लढती जिंकल्यानंतर शनिवारी त्यांना बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यांचे 14 लढतीनंतर 24 गुण झाले आहेत.

नायजेरियन आघाडीपटू केनेथ इकेचुक्वू याने 15 व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. रिचर्ड कॉस्ताच्या शानदार क्रॉसपासवर त्याने माजी विजेत्यांच्या खाती गोलची भर टाकली. 38 व्या मिनिटास जमैकन खेळाडू जॉर्डेन फ्लेचर याच्या गोलमुळे गोकुळम केरळास पिछाडी भरून काढता आली. महंमद जासिम याने मैदानाच्या उजव्या भागातून दिलेल्या क्रॉसपासवर फ्लेचरने गोलक्षेत्रातून सणसणीत फटक्यावर चेंडूस अचूक दिशा दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

SCROLL FOR NEXT