Santosh Trophy National Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत गोव्याची 24 नोव्हेंबरपासून मोहीम सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी: संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत (Santosh Trophy National Football Tournament) यंदा 75 वी आवृत्ती असून गोव्याची (Goa) मोहीम 24 नोव्हेंबरपासून सुरू होईल. गोव्याचा पश्चिम विभागीय पात्रता फेरीत अ गटात समावेश असून गुजरात, दमण-दीव, दादरा आणि नगर हवेली हे प्रतिस्पर्धी आहेत. पश्चिम विभागीय ब गटात राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेशला समावेश आहे. अ गट सामने भावनगर येथे, तर ब गट सामने जयपूर येथे खेळले जातील. प्रत्येक गटातील विजेता संघ राष्ट्रीय स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळेल. ही स्पर्धा नंतर केरळमध्ये होणार आहे. गोव्याचा पश्चिम विभागीय अ गट फेरीत पहिला सामना 24 नोव्हेंबरला दमण-दीव संघाविरुद्ध होईल. नंतर 26 नोव्हेंबरला दादरा आणि नगर हवेली संघाविरुद्ध, तर गुजरातविरुद्ध 28 नोव्हेंबरला सामना होईल.

गतमोसमात कोविड-19 महामारीमुळे संतोष करंडक स्पर्धा झाली नव्हती. त्यापूर्वी 2019-20 मोसमातही पात्रता फेरीनंतर मुख्य फेरी कोरोना विषाणू महामारीमुळे होऊ शकली नव्हती. गोव्याने राष्ट्रीय स्पर्धेत 13 वेळा अंतिम फेरी गाठली असून पाच वेळा विजेतेपद, तर आठ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. शेवटच्या वेळेस गोव्याने ही स्पर्धा 2008-09 मोसमात जिंकली होती. 2018-19 मोसमात गोव्याने उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोवा बीचवर ड्रग डिलचा प्लॅन झाला फेल, उझबेकिस्तानच्या महिलेला अटक

Goa: विद्यार्थ्यांना शिक्षा देणं शिक्षकांना भोवणार; गोवा शिक्षण खात्याचा कठोर कारवाईचा आदेश

Maharashtra Farmer: महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना राबवल्या?

Goa Rain: गोव्यात पावसाचा जोर; चरावणे धबधब्यावर अडकलेल्या 47 मुलांची सुखरुप सुटका

Oscar 2025: ऑस्कर 2025 साठी भारताची धुरा "लापता लेडीज" च्या हातात

SCROLL FOR NEXT