गोव्याच्या झेवियरला राष्ट्रीय जलतरणात ब्राँझपदक!

गोव्याच्या झेवियर मायकल (Xavier Michael) डिसोझा याने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.
Xavier Michael
Xavier MichaelDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बंगळूर (Bangalore) येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सीनियर जलतरण स्पर्धेत गोव्याच्या झेवियर मायकल (Xavier Michael) डिसोझा याने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. त्याने 58.96 सेकंद वेळ नोंदविली. स्पर्धेत ऑलिंपियन जलतरणपटू श्रीहरी नटराज याचा सहभाग असल्याने उत्सुकता होती. नटराजने नवा स्पर्धा विक्रम नोंदविताना 55.10 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. त्याने आपलाच 55.63 सेकंद वेळेचा विक्रम मोडला. एस. शिवा याने 57.60 सेकंद वेळेसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला, तर झेवियरने तिसरा क्रमांक मिळविला. झेवियर सध्या बंगळूर येथे पूर्णवेळ नियमित सराव करतो. तेथील गॅफ्रे ॲक्वेटिक सेंटर येथे त्याला जलतरण प्रशिक्षक भूषण कुमार यांचे मार्गदर्शन लाभते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com