Goan girls and boys win medals at National School Chess Championships
Goan girls and boys win medals at National School Chess Championships Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या दिया, एथन, रुबेन यांना राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पदके

दैनिक गोमन्तक

पणजी: ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या दिया सावळ हिने मुलींत सुवर्ण, खुल्या गटात एथन वाझ याने रौप्य, तर रुबेन कुलासो याने ब्राँझपदक जिंकले. या कामगिरीमुळे गोव्याचे तिन्ही बुद्धिबळपटू आशियाई आणि जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत.

मडगाव येथील मनोविकास इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या दिया हिने नऊ वर्षांखालील गटात सर्वाधिक नऊ गुण प्राप्त करत सुवर्णपदक जिंकले. एथनला सात गुणांसह ११ वर्षांखालील खुल्या गटात दुसरा क्रमांक मिळाला. तो सां जुझे द आरियल येथील द किंग्ज स्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकतो. 15 वर्षांखालील खुल्या गटात रुबेनला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. तो मडगाव येथील लॉयला हायस्कूलचा दहाव्या इयत्तेतील विद्यार्थी आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या गोव्याच्या अन्य खेळाडूंत 13 वर्षांखालील मुलींत वालंका फर्नांडिसने सहा गुणांसह अकरावा क्रमांक मिळवून बक्षीस विजेत्या खेळाडूंत स्थान मिळविले. सात वर्षांखालील वयोगटात रिशित गावस याने साडेपाच, 13 वर्षांखालील वयोगटात एड्रिक वाझ याने पाच, याच वयोगटात रोहित गावस याने चार गुण नोंदविले.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघावतीने ऑल ओडिशा चेस असोसिएशन यांच्यातर्फे राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीने राज्य संघाची शिफारस केली होती. खुल्या गटात पाच, तर मुलींत दोघी मिळून सात सदस्यीय गोवा संघ स्पर्धेत सहभागी झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT