थॉमस चषक विजेत्यांशी PM मोदींची विशेष बातचीत, खेळाडूंचे केले कौतूक

बॅडमिंटनची प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या थॉमस कपवर भारताने प्रथमच आपले नाव कोरले आहे.
PM Narendra Modi special interaction with Thomas Cup winners
PM Narendra Modi special interaction with Thomas Cup winners ANI

बॅडमिंटनची प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या थॉमस कपवर भारताने प्रथमच आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा जिंकून भारताने एक इतिहास रचला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थॉमस कप विजेत्यांशी खास बातचीत केली. तुमच्या विजयाचा संपूर्ण भारताला अभिमान आहे, असे खेळाडूंशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

यावेळी पीएम मोदींनी टीमला सांगितले की, तुम्हाला आता अधिक खेळायचे आहे आणि क्रीडा जगतात देशाला पुढे न्यायचे आहे. देशातील येणाऱ्या पिढीला खेळासाठी प्रेरित करणे हे आता तुमचे कर्तव्य आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. माझ्याकडून आणि संपूर्ण भारताकडून तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुमच्या भेटीने आमचे मनोबल वाढले आहे.आपल्याला भविष्यातही अशाच प्रकारे देशासाठी पदके जिंकायची आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Narendra Modi special interaction with Thomas Cup winners
टायगर कप अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत दवर्ली, ड्युन्स क्लबची विजयी कूच

आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे कारण आम्ही 73 वर्षांनी थॉमस कप जिंकला आहे. उपांत्यपूर्व फेरीदरम्यान दडपण होते कारण आम्हाला माहित होते की आम्ही हरलो तर पदक मिळणार नाही. आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवर जिंकण्याचा निर्धार केला होता, असे टिममधील प्रणय नावाच्या खेळाडूने सांगितले.

PM Narendra Modi special interaction with Thomas Cup winners
IPL: राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने मोडला रोहित शर्मा, जडेजाचा विक्रम

14 वर्षीय शटलर उन्नती हुडा हिने पीएम मोदींना सांगितले की, "मला सर्वात जास्त प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे तुम्ही मेडलिस्ट आणि नॉन-मेडलिस्ट असा भेदभाव कधीच करत नाही. या स्पर्धेत मला खूप काही शिकायला मिळाले."

या दरम्यान सर्व टिम सोबत मोदी यांनी दिलखुलास गप्पा केल्या. मला तुमच्या डोळ्यात तो जोश दिसतो, तो आगामी काळात कायम ठेवा, देशासाठी आणखी विजयांच्या पताका उंचवा, भविष्यातही देशाच्या गौरवासाठी खेळत रहा, असे म्हणत पीएम मोदी यांनी थॉमस कप विजेत्यांचा निरोप घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com