Vaishnavi Prabhu Dainik Gomantak
क्रीडा

Vaishnavi Prabhu: मला खेळू द्या...गोव्याची बॉक्सर वैष्णवी प्रभू का जोडतेय विद्यापीठाला हात?

इतर राज्यातील खेळाडूंना जर सवलत मिळत असेल तर, गोवा अशी सवलत का देऊ शकत नाही

Pramod Yadav

"गोवा विद्यापीठाने राष्ट्रीय आंतर विद्यापीठ किंवा राष्ट्रीय खुल्या गटातील स्पर्धा यापैकी एका स्पर्धेची निवड करण्यास सांगितले आहे. दोन्ही स्पर्धा माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. माझे शिक्षणाचे अखेरचे वर्ष असून, मला पुन्हा ही संधी मिळणार नाही, त्यामुळे मला खेळू द्या." अशी हात जोडून विनंती गोव्याची बॉक्सर वैष्णवी प्रभू (Vaishnavi Prabhu) हिने गोवा विद्यापीठाला केली आहे.

वैष्णवी सध्या भोपाळमध्ये आहे. वैष्णवीचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. "राष्ट्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या निवड प्रक्रियेसाठी गेले असता, त्यांनी 25 डिसेंबरला टीमसोबत जाण्यात गोव्यात यायला सांगितले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी 27 डिसेंबर रोजी वजन चाचणी असल्याने आम्ही येथूनच स्पर्धा स्थळी येऊ असे आम्ही सांगितले तेव्हा विद्यापीठाने नकार दिला." असे वैष्णवीने या व्हिडिओत म्हटले आहे.

"इतर राज्यातील खेळाडूंना जर सवलत मिळत असेल तर, गोवा अशी सवलत का देऊ शकत नाही." असा सवाल देखील वैष्णवीने उपस्थित केला आहे. मला या स्पर्धेत खेळाचे आहे, यासाठी येणारा खर्च देखील आम्ही करण्यासाठी तयार आहोत. असे वैष्णवी म्हणाली.

"आदर्श नियमावलीचे पालन आम्ही करत असतो. दोन्ही स्पर्धेच्या तारखा एकसारख्या येत असल्याने आम्ही खेळाडूंना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र दिले. तसेच, याबाबत सवलत मागण्यासाठी कोणीही कार्यालयात आले नाही. आम्हाला याप्रकरणी एक फोन आला होता पण, आम्ही फोनवर विश्वास ठेवत नाही." असे गोवा विद्यापीठाचे शारिरीक शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सहाय्यक संचालक बालचंद्र जादर यांनी एका इंग्राजी वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणावरून गोवा बॉक्सिंग असोसिएशनच्या सचिव दनुस्का द गामा यांनी गोवा विद्यापीठ आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे. "गोव्यातील महिला बॉक्सर पुरूष खेळाडूंपेक्षा चांगल्या आहेत. महिला बॉक्सर समस्यांचा सामना करत असताना विद्यापीठ सहकार्य करत नाही ही चिंताजनक बाब आहे. क्रीडामंत्री रज्यात खेळांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत असताना विद्यापीठ या प्रयत्नांना हरताळ फासण्याचे काम करत आहे." असे दनुस्का द गामा म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT