Team  Dainik Gomantak
क्रीडा

बोर्ड सेलिंग स्पर्धेत गोव्याला पाच सुवर्ण पदके

एकूण सहा पदकांसह सर्वोत्तम कामगिरी, डेन कुएल्हो अव्वल

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याने अखिल भारतीय बोर्ड सेलिंग स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना एकूण पाच सुवर्ण व एक रौप्य मिळून सहा पदके जिंकली. दोना पावला येथे झालेल्या स्पर्धेत गोव्याचा डेन कुएल्हो अव्वल ठरला. (Goa wins five gold medals in board sailing competition)

स्पर्धेला शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला, त्यामुळे स्पर्धकांच्या सेलिंग उपकरणांची हानी झाली. ऐनवेळी डागडुजी करून सेलर्सनी रविवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी स्पर्धेत भाग घ्यावा लागला. दिवसभरात वाऱ्याचा वेग चांगला राहिल्यामुळे शर्यतींना आडकाठी आली नाही.

गोव्याच्या डेन कुएल्हो याच्यासाठी रविवारच्या दोन्ही शर्यती महत्त्वाच्या होत्या. एबाद अली याला मागे टाकण्यासाठी गोव्याच्या सेलरला दोन्ही शर्यती जिंकणे अत्यावश्यक होते. आर्मी यॉटिंग नोडच्या एबाद अली याच्यावर डेन याने नऊ गुणांची आघाडी घेत वर्चस्व राखले. तो आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चाचणीसाठी मुंबईस रवाना होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय यॉटिंग संघटनेचे संयुक्त सचिव कॅप्टन जितेंद्र दीक्षित यांच्या हस्ते झाले.

कात्याला आंतरराष्ट्रीय मान्यता

गोव्याची कात्या कुएल्हो हिने महिलांच्या आयक्यू फॉईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय आयक्यू फॉईल क्लास असोसिएशनची मान्यता प्राप्त केली. पुरुषांच्या या शर्यतीत आर्मी यॉटिंग नोडच्या सौरभ कुमार याला पहिला क्रमांक मिळाला.

पर्लची सोनेरी चमक

महिलांच्या (Women) आरएसःवन गटात गोव्याच्या पर्ल कोलवाळकर हिने सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या रेसबोर्डमध्ये ओवायएच्या डी. शेखर राव याने पहिला क्रमांक मिळविला. रेसबोर्ड युवा पुरुष गटात गोव्याच्या आवेलिन फर्नांडिसने सुवर्ण, तर आदर्श चुनेकर याने रौप्यपदक जिंकले. रेसबोर्ड युवा मुलींत कात्या कुएल्हो विजेती ठरली. या प्रकारातील मास्टर्स प्रकारात कमांडर (निवृत्त) आशिष सक्सेनास प्रथम स्थान प्राप्त झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT