लोड शेडिंगमुळे बार्देश तालुक्यातील लोक त्रस्त

उन्हाळ्यात लोड शेडिंग होत असल्याने लोक तक्रार करत आहेत.
Load shedding
Load sheddingDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बार्देश तालुक्यातील लोकांना मागील काही दिवसांपासून वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील लोकांना भर उन्हाळ्यात लोकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागत आहे. (People in Bardesh taluka are suffering due to load shedding in goa)

Load shedding
मुसळधार पावसामुळे हळदोणा येथे वीजपुरवठा खंडित

उन्हाळ्यात (Summer) लोड शेडिंग होत असल्याने लोक तक्रार करत आहेत. म्हापसा, हळदोण, साळगाव मतदारसंघासह तालुक्यातील इतर भागांत वारंवार वीज गुल होण्याचा प्रकार घडत आहे. ही वीज कपात थांबवावी अशी लोकांची मागणी आहे.

गोव्यातील अनेक पथदीवे बंद स्थितीत आहेत. याचबरोबर राज्यातील अनेक भागांतील विजेच्या केबल्स खराब झाल्या आहेत. या समस्यांचे निवारण व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. परिणामी वीज खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा निर्णय वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतला आहे.

Load shedding
गोव्यात पुढील 4-5 दिवस गडगडाटांसह पाऊसाची शक्यता

सरकारने (Government) काही वर्षांपूर्वी बसवेलेले पथदीवे बंद पडले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी काळोख पसरलेला असतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या विषयावर बोलताना ढवळीकर म्हणाले, जीर्ण झालेली केबल बदलण्याचे आदेश खात्याला देण्यात येणार आहेत. मी आताच या खात्याचा कारभार हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खंडित विजेच्या समस्येवर तोडगा काढला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com