बॉक्सिंग  Dainik Gomantak
क्रीडा

Goa: क्रीडा प्राधिकरणाने फोडले बॉक्सिंग संघटनेवर खापर

गोवा क्रीडा प्राधिकरणाचे (Goa Sports Authority) सहाय्यक सचिव (कार्यक्रम) महेश रिवणकर यांनी गोवा अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनप्रकरणी (Goa Amateur Boxing Association) माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे अनुदान रोखले जाण्यामागे संघटनेचा अनियमित कारभार कारणीभूत असल्याचे गोवा क्रीडा प्राधिकरणाने म्हटले असून याप्रकरणी बॉक्सिंग संघटनेवर खापर फोडले आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे सहाय्यक सचिव (कार्यक्रम) महेश रिवणकर यांनी गोवा अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनप्रकरणी माहिती दिली आहे. क्रीडा प्राधिकरण गेली तीन दशके राज्यात बॉक्सिंगच्या वाढीस कटीबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष लेनी डिगामा यांनी याआठवड्यात राज्याचे क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर बॉक्सिंगबाबत अनभिज्ञ असून पाच वर्षांचे 22 लाख रुपये अनुदान दिले नसल्याचा आरोप केला होता. (Goa Sports Authority has said that the suspension of the Goa Amateur Boxing Association's grant was due to irregular management of the association.)

क्रीडा प्राधिकरणाच्या स्पष्टीकरणानुसार 2019 पर्यंत बॉक्सिंग संघटनेला 45 लाख 24 हजार 569 रुपये अनुदान मिळाले आहे. 2013-14 ते 2014-15 आणि 2018-19 ते 2019-2020 या कालावधीत बॉक्सिंग संघटनेला अनुदान देण्यात आलेले नाही, कारण त्या कालावधीत संघटनेला दिलेल्या सहभाग अनुदानाचा लेखाअहवाल सादर करण्यात आलेला नाही.

क्रीडा प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, विभागीय आणि राष्ट्रीय सहभागसंदर्भात बॉक्सिंग संघटना लेखापरीक्षित अंदाजपत्रक सादर करण्यात अनियमित आहे, जे पुढील अनुदान मंजूर करण्यासाठी पूर्वापेक्षित आहे. खेळाडूंच्या विभागीय व राष्ट्रीय सहभागावर परिणाम होऊ नये यासाठी खूपवेळा प्राधिकरणाकडून नियम शिथीलही करण्यात आला. बॉक्सिंग संघटनेने 2018-2019 मध्ये पाच ते सहा वर्षांच्या कालावधीचे वार्षिक लेखापरीक्षित अंदाजपत्रक सादर केले, जे अतिशय अयोग्य आहे.

क्रीडा प्राधिकरणाची बॉक्सिंगला मदत

गोवा अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे सोसायटी कायद्यांतर्गत खूप मोठ्या कालावधीसाठी नूतनीकरण झालेले नाही हे निदर्शनास आल्यानंतर क्रीडा प्राधिकरणाने 21 ऑगस्ट 2020 रोजी संघटनेच्या नोंदणी नूतनीकरणात मदत केली होती याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संघटनेची निवडणूक ऑक्टोबर 2020 मध्ये होणे अपेक्षित होती, पण ती झालेली नाही, याबाबत संघटनेला तोंडी आणि लेखी स्मरण करून देण्यात आलेले आहे असे नमूद करून क्रीडा प्राधिकरणाने दक्षिण गोव्यातील फातोर्डा व वास्को येथे नवे बॉक्सिंग केंद्र सुरू करण्याची ग्वाही दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT