Women Cricketer Tarannum Pathan And Priyanka Kaushal Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket News : गोमंतकीय महिला क्रिकेटमध्ये प्रथमच ‘पाहुण्या’; जीसीए’चा निर्णय

किशोर पेटकर

Goa Senior Women's Cricket Team : गोमंतकीय महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सीनियर संघातून ‘पाहुण्या’ क्रिकेटपटू खेळताना दिसतील. बडोद्याची अनुभवी अष्टपैलू तरन्नुम पठाण आणि मध्य प्रदेशची फिरकी गोलंदाज प्रियांका कौशल यांना त्यांच्या संघटनेकडून ना हरकत दाखला मिळाल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) आगामी मोसमात निवडीसंदर्भात हिरवा कंदील दाखविला.

‘‘या दोघीही गोव्यातर्फे खेळण्यास इच्छुक होत्या. त्यांना त्यांच्या संघटनेने ना हरकत दाखला दिलेला असून जीसीएची त्यांना मान्यता आहे. यासंदर्भात बीसीसीआय सोपस्कार पूर्ण केले जातील. त्यांचा अनुभव गोव्याच्या सीनियर संघासाठी मौल्यवान ठरेल.

राज्यातील महिला क्रिकेटचा दर्जा आणि स्पर्धेतील कामगिरी उंचावणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,’’ असे जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी शुक्रवारी सांगितले.

यावर्षी एप्रिलमध्ये पर्वरी येथे झालेल्या गोवा महिला प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेत तरन्नुम खेळली होती. तिने या स्पर्धेत व्हेंचर इलेव्हनचे प्रतिनिधित्व करताना पणजी जिमखान्याविरुद्ध साखळी फेरीत अष्टपैलू (८५ व ३-३५) कामगिरी प्रदर्शित केली होती. मध्य प्रदेशकडून सीनियर पातळीवरील टी-२० व एकदिवसीय क्रिकेट खेळलेली प्रियांका डावखुरी फिरकी गोलंदाज आहे.

मोहीम 19 ऑक्टोबरपासून

गोव्याचा सीनियर महिला क्रिकेट संघ टी-२० स्पर्धेत 19 ऑक्टोबरपासून नागपूर येथे, तर एकदिवसीय स्पर्धेत चार जानेवारीपासून झारखंडमधील रांची येथे खेळेल. टी-२० स्पर्धेसाठी ड गटात गोव्यासह हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, उत्तराखंड, छत्तीसगड, मणिपूर हे संघ आहेत. एकदिवसीय स्पर्धेत गोव्याचा संघ क गटात राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाना, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र व मेघालय या संघांविरुद्ध खेळेल.

तरन्नुमच्या दोनशेहून जास्त विकेट

तरन्नुम २९ वर्षांची आहे. ऑफस्पिन गोलंदाज आणि उपयुक्त फलंदाजी करणाऱ्या तरन्नुमने १५ वर्षांच्या कारकिर्दीत सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये दोनशेहून जास्त विकेट मिळविल्या आहेत. असा पराक्रम करणारी ती गुजरात राज्यातील पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिने बीसीसीआय स्पर्धेत बडोद्यातर्फे शंभर गडी बाद केले आहेत.

त्याबद्दल गतआठवड्यात बडोदा क्रिकेट संघटनेने तिचा सत्कार केला होता. मात्र आता त्या संघटनेशी बिनसल्यामुळे तिने आता गोव्याकडून खेळण्याचे ठरविले. बडोदा क्रिकेट संघटनेकडून होणारे दुर्लक्ष आणि मिळणारी सापत्नभावाची वागणूक याबद्दल आरोप तिने बडोद्यातील प्रसारमाध्यमात केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT