पणजी : विजयासाठी बाकी 41 धावांचे लक्ष्य उत्तर प्रदेशने शुक्रवारी सकाळी 56 चेंडूंत गाठले. गोव्यावर दहा विकेटने सोपा विजय नोंदवून त्यांनी बोनस गुणाचीही कमाई केली आणि कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या एलिट एफ गटात अव्वल स्थानही मिळविले.
अळूर-बंगळूर येथे सामन्याच्या (Match) चौथ्या दिवशी सकाळी उत्तर प्रदेशने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. विजयासाठी 72 धावांचे आव्हान स्वीकारल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर उत्तर प्रदेशने 41 धावा केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्यांच्या समीर रिझवी (44) व आंजनेय सूर्यवंशी (30) या नाबाद सलामीवीरांनी बोनस गुण नजरेसमोर ठेवूनच फलंदाजी केली. 16.2 षटकांत बिनबाद 74 धावा करून उत्तर प्रदेशने सलग दुसरा सामना जिंकला. त्यांना विजयाचे सात गुण मिळाले.
उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) गटात सर्वाधिक 13 गुण झाले आहेत. अन्य एका सामन्यात केरळने हिमाचल प्रदेशवर डाव व 38 धावांनी मात केली. केरळ गटात 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. उपांत्यपूर्व फेरीसाठी आता केरळ (Kerala) व उत्तर प्रदेश यांच्यात चुरस असेल. गोव्याच्या खाती फक्त एक गुण असून शेवटचा साखळी सामना पाच एप्रिलपासून दोन्ही लढती गमावलेल्या हिमाचल प्रदेशविरुद्ध होईल.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव : 179 व दुसरा डाव : 192.
उत्तर प्रदेश, पहिला डाव : 300 व दुसरा डाव : बिनबाद 74.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.