ISL Football Dainik Gomatak
क्रीडा

ISL Football:'बंगळूरला'ला विजयी सुर गवसला अन् 'गोवा'ने घरच्या मैदानावर सामना गमावला

आयएसएल: सलग चार पराभवानंतर पहिला विजय

दैनिक गोमन्तक

पणजी: बंगळूर एफसी धोकादायक प्रतिस्पर्धी असल्याचे मत एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले होते, ही भीती अखेरीस रविवारी संध्याकाळी खरी ठरली. माजी विजेत्यांनी सलग चार पराभवानंतर अखेर विजयी चव चाखताना 2-0 फरकाने विजय साजरा केला.

(Goa defeated Bangalore in the Indian Super League football tournament)

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पॅनिश खेळाडू हावियर हर्नांडेश बंगळूर एफसीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अनुक्रमे 27 व 57 व्या मिनिटास गोल नोंदवत संघाला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला. मागील सलग चार सामने पराभूत झालेल्या या संघाला एकही गोल नोंदविता आला नाही.

सायमन ग्रेसन यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आता सात लढतीनंतर सात गुण झाले असून ते आठव्या स्थानी आले. एफसी गोवाचा हा सात लढतीतील तिसरा, तर घरच्या मैदानावरील यंदाचा पहिलाच पराभव ठरला. त्यांचे सात लढतीनंतर 12 गुण कायम राहिले. एफसी गोवाचा पुढील सामना 1 डिसेंबर रोजी मुंबईत मुंबई सिटी एफसीविरुद्ध होईल.

एफसी गोवास चुका नडल्या

एफसी गोवाच्या बचावफळीतील चुकीचा लाभ पहिला गोल नोंदविताना हावियरला मिळाला. यावेळी गोलक्षेत्रात चेंडू मोकळा ठेवणे एफसी गोवाला महागात पडले. रॉय कृष्णाच्या असिस्टवर हावियरने अचूक संधी साधली. दुसऱ्या गोलच्या वेळेसही एफसी गोवाने चूक केली. त्यांच्या खेळाडूचा कॉर्नर फटका उदांता सिंगच्या ताब्यात गेला. त्याने चेंडू हावियरकडे पास केला, यावेळी स्पॅनिश खेळाडूने जोरदार मुसंडी मारत गोलरक्षक धीरज सिंगला अजिबात संधी दिली नाही.

दृष्टिक्षेपात...

  • आयएसएल स्पर्धेतील 12 लढतीत बंगळूरचे एफसी गोवाविरुद्ध 6 विजय

  • 33 वर्षीय हावियर हर्नांडेझचे यंदा 6 लढतीत 2 गोल

  • बंगळूरविरुद्ध 6 सामने अपराजित राहिल्यानंतर एफसी गोवा अखेर पराभूत

  • बंगळूरच्या यंदा स्पर्धेत 2 क्लीन शीट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT