Rivaba Jadeja: 'पत्नीच्या निवडणूक प्रचारासाठी फिट अन्...'; रवींद्र जडेजावर विरोधकांचा हल्लाबोल

Gujarat Assembly Polls: गुजरात विधानसभा निवडणुकीत रवींद्र जडेजा चांगलाच सक्रिय दिसत आहे. पत्नी रिवाबा जडेजासाठी तो सातत्याने रॅलीत सहभागी होत आहे.
Rivaba Jadeja & Ravindra Jadeja
Rivaba Jadeja & Ravindra JadejaDainik Gomantak
Published on
Updated on

Ravindra Jadeja: गुजरात विधानसभा निवडणुकीत रवींद्र जडेजा चांगलाच सक्रिय दिसत आहे. पत्नी रिवाबा जडेजासाठी तो सातत्याने रॅलीत सहभागी होत आहे. जेडजाची पत्नी रिवाबा गुजरातमधील जामनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, निवडणूक रॅलींमध्ये अनफिट रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) सक्रियता पाहून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अनफिट असल्यामुळे त्याला पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले असताना, निवडणुकीच्या मोसमात तो इतका तंदुरुस्त कसा दिसतो, हा प्रश्न आहे. तासनतास रॅली काढता कशी येते?

Rivaba Jadeja & Ravindra Jadeja
Gujrat Assembly Elections: गुजरात निवडणुकीतील PM मोदींच्या मॅरेथॉन रॅलींना आजपासून सुरुवात

दुसरीकडे, यामागे त्याची पत्नी निवडणूक लढवत कारण सांगितले जात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) निकाल पुढील महिन्यात 8 डिसेंबरला लागणार आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच जडेजाला अनफिट घोषित करण्यात आले होते.

पुढील महिन्यात बांगलादेशसोबत मालिका होणार

त्याच्या या सक्रियतेचा बीसीसीआयलाही राग आल्याचे बोलले जात आहे. त्याची दुखापत पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. अपात्र असूनही तो राजकीयदृष्ट्या सक्रिय आहे. या दुखापतीमुळे त्याला टी-20 विश्वचषकातून बाहेर राहावे लागले होते, त्यानंतर तो न्यूझीलंडसोबतच्या टी-20 आणि वनडे मालिकेतूनही बाहेर होता.

Rivaba Jadeja & Ravindra Jadeja
Gujarat-Himachal Election: गुजरात, हिमाचलमध्ये 'इतके' कोटी रूपये जप्त

जडेजाची बहीणही रिंगणात

गुजरात विधानसभा निवडणुकीत जडेजाची पत्नीच नाही तर त्याची बहीण नयनाबा जडेजाही निवडणुकीच्या मैदानात उतरताना दिसत आहे. मात्र, नयनाबा काँग्रेस पक्षाच्या वतीने रवींद्र जडेजाच्या विरोधात प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान दोघेही एकमेकांच्या विरोधात दिसले आहेत. नयनाबा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी पण जामनगरमधून तिकीट मागितले होते, पण काँग्रेसने मला तिकीट दिले नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com