Goa cricket Association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket: संभाव्य रणजी संघात नवोदितांनाही संधी

Goa Cricket: आगामी सीनियर क्रिकेट मोसमासाठी 24 खेळाडूंची निवड

किशोर पेटकर

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) व सीनियर क्रिकेट मोसमासाठी 24 संभाव्य खेळाडूंची निवड केली आहे. त्यात अनुभवींसह नवोदितांनाही संधी देण्यात आली. दिल्लीचे के. भास्कर पिल्लई (K. Baskar Pillai) यांची यापूर्वीच गोवा रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचा यष्टिरक्षक एकनाथ केरकर हा संभाव्य संघातील एकमेव पाहुणा खेळाडू आहे. बाकी दोघा पाहुण्या खेळाडूंची निवड नंतर होण्याचे संकेत आहेत. जीसीए सचिव विपुल फडके (Vipul Fadke) यांनी शुक्रवारी संभाव्य संघातील 24 खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमपूर्व सराव शिबिर प्रक्रिया सोमवारपासून (ता. 2) सुरू होईल.

सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफची पर्वरी येथील गोवा क्रिकेट अकादमी संकुलात आरटीपीसीआर चाचणी होईल. त्यानंतर चार ऑगस्टपासून नियमित सरावास सुरवात होईल. मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई 12 ऑगस्टपर्यंत गोव्यात दाखल होतील व ते सूत्रे स्वीकारतील, असे फडके यांनी नमूद केले. संभाव्य संघ विपुल फडके, क्रिकेट प्रशिक्षण-ऑपरेशन्स संचालक प्रकाश मयेकर, निवड समितीचे अध्यक्ष गिरीश पारेख, सदस्य आनंद म्हापणकर व संजय धुरी यांच्या समितीने निवडला.

गोव्याचा संभाव्य संघ ः अमोघ देसाई, आदित्य कौशिक, अमूल्य पांड्रेकर, दर्शन मिसाळ, दीपराज गावकर, एकनाथ केरकर, फेलिक्स आलेमाव, हेरंब परब, ईशान गडेकर, लक्षय गर्ग, मलिकसाब शिरूर, मंथन खुटकर, मोहित रेडकर, नेहाल सुर्लकर, राजशेखर हरिकांत, ऋत्विक नाईक, समर दुभाषी, समित आर्यन मिश्रा, स्नेहल कवठणकर, सुमीरन आमोणकर, सुयश प्रभुदेसाई, वैभव गोवेकर, विश्वंबर काहलोन, विजेश प्रभुदेसाई.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

Ashwin on Rohit Virat fitness: "आता वय वाढलंय तर...": रोहित आणि विराटबद्दल अश्विनचं वादग्रस्त विधान Watch Video

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT