Goa Cricket: प्रशिक्षक भास्कर यांचे मत ठरणार निर्णायक

Goa Cricket: रणजी संघ मार्गदर्शक ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणार
Goa Cricket : K. Bhaskar Pillai
Goa Cricket : K. Bhaskar PillaiFile Photo
Published on
Updated on

पणजीः गोव्याच्या (Goa) रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट संघ निवडीत मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त के. भास्कर पिल्लई (K. Bhaskar Pillai) यांचे मत निर्णायक ठरणार आहे. विशेषतः पाहुणा क्रिकेटपटू निवडताना मार्गदर्शकांशी सल्लामसलत केली जाईल आणि त्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशन (Goa Cricket Association) निर्णय घेईल, असे सूत्राने सांगितले. आगामी मोसमासाठी जीसीएने मुंबईचा यष्टिरक्षक एकनाथ केरकर या पाहुण्या क्रिकेटपटूस संघात कायम राखले आहे. बाकी दोन जागांसाठी प्रत्येकी एक वेगवान गोलंदाज व फलंदाज निवडण्याकडे जीसीएचा कल आहे. काही अर्ज आले आहेत, मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भास्कर यांचे मत आजमावण्यात येईल, तसेच संबंधित खेळाडूंना गोव्यात बोलावून मुख्य प्रशिक्षकांच्या उपस्थितीत चाचणी घेऊनच निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती जीसीएतील सूत्राने दिली. पाहुणा खेळाडू निवडताना त्याच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष दिले जाईल, कारण गतमोसमात ३६ वर्षीय अशोक दिंडा याला करारबद्ध केले होते, पण नंतर या अनुभवी खेळाडूच्या तंदुरुस्तीने दगा दिला होता.

Goa Cricket : K. Bhaskar Pillai
Goa Cricket: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी भास्कर पिल्लई यांची निवड

प्राप्त माहितीनुसार, गोवा रणजी क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी आणि जीसीएशी सविस्तर चर्चा करण्यासाठी भास्कर पिल्लई ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणार आहेत. ५८ वर्षीय दिल्लीच्या माजी फलंदाजाने यापूर्वी राजस्थान, त्रिपुरा, दिल्ली, उत्तराखंडच्या रणजी संघाला मार्गदर्शन केले आहे.

Goa Cricket : K. Bhaskar Pillai
IND VS ENG: मुंबईचे 'हे' दोन खेळाडू इंग्लंडवारीसाठी सज्ज!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com