Goa Cricket: क्रिकेटपटूंच्या आरोग्य सुरक्षेसाठी कटिबद्ध ः लोटलीकर

Goa Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (Goa Cricket Association) ज्युनियर मुलगे, महिला मोसमपूर्व शिबिरास सुरवात
Goa Cricket:  U-19 cricket players with office bearers at Porvorim
Goa Cricket: U-19 cricket players with office bearers at PorvorimDainik Goamantak
Published on
Updated on

पणजी ः आगामी मोसम ध्यानात ठेवून गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Asoociation) 19 वर्षांखालील मुलगे (U-19 Boys) व सीनियर महिला (Senior Women) संघाचे सराव शिबिर सुरू केले आहे. स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या आरोग्य सुरक्षेसाठी संघटना कटिबद्ध असून त्यादृष्टीने खबरदारी घेतली जाईल व कोविड-19 (Covid-19) मार्गदर्शक शिष्टाचाराची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे जीसीए अध्यक्ष सूरज लोटलीकर (Suraj Lotlikar) यांनी सोमवारी सांगितले.

गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलांच्या सराव शिबिरास सोमवारी सकाळी पर्वरी (Porvorim) येथील जीसीए अकादमी (GCA Academy) नेट संकुलात सुरवात झाली. राजेश कामत (Rajesh Kamat) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजीचा इनडोअर सराव केला. यावेळी सहाय्यक प्रशिक्षक राहुल केणी, ट्रेनर निनाद पावसकर यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात अनंत तांबवेकर (Anant Tambvekar) यांच्या मार्गदर्शनाखाली सीनियर महिला क्रिकेट सराव सत्र सुरू झाले.

Goa Cricket:  U-19 cricket players with office bearers at Porvorim
Tokyo Olympics: गोव्याचे लेनी टोकियोला रवाना

सध्या सकाळच्या सत्रात ज्युनियर मुलगे व दुपारच्या सत्रात महिला, अशा वेळापत्रकानुसार मोसमपूर्व इनडोअर शिबिर सुरू राहील. कोविड-19 एसओपी पाळण्यावर भर दिला जात आहे, असे जीसीए क्रिकेट प्रशिक्षक व ऑपरेशन्स संचालक प्रकाश मयेकर यांनी सांगितले. इनडोअर नेट संकुलात गर्दी टाळण्यासाठी मुलगे व महिला खेळाडूंची गटात विभागणी करण्यात आल्याची माहिती मयेकर यांनी दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियोजित वेळापत्रकानुसार, सप्टेंबरअखेरीस 19 वर्षांखालील मुलगे व महिला संघ एकदिवसीय स्पर्धा खेळेल. शिबिराच्या पहिल्या दिवशी जीसीए सचिव विपुल फडके, ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष रोहित अस्नोडकर, सदस्य अब्रार खान व सॅबी फर्नांडिस, माजी रणजीपटू शरद पेडणेकर यांचीही उपस्थिती होती.

Goa Cricket:  U-19 cricket players with office bearers at Porvorim
अनुराचे ‘टॉप 50’ लक्ष्य; राज्यातील बॅडमिंटनपटूंचा उत्साह दुणावला !

जैवसुरक्षा वातावरण सक्तीचे

यावेळी ज्युनियर मुलांना संबोधित करताना जीसीए अध्यक्ष लोटलीकर यांनी सांगितले, की ``स्पर्धेच्या कालावधीत प्रत्येक खेळाडूसाठी जैवसुरक्षा वातावरण (बायो-बबल) सक्तीचे असेल. खेळाडूंनी त्यासाठी मानसिक तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. आजपासून सुरू झालेल्या इनडोअर नेट शिबिरापासून खेळाडूंनी आपण जैवसुरक्षा वातावरणात आहोत असे मानून कार्यरत राहावे. गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे, शिबिर सत्र संपवून घरी गेल्यानंतर सामाजिक भान राखावे. एका साध्या चुकीमुळे कारकिर्दीला फटका बसू शकतो,`` मोसमपूर्व शिबिर, नंतर स्पर्धा कालावधीत क्रिकेटपटूसाठी शिस्तबद्ध राहणीमान खूपच निर्णायक ठरेल, असे विपुल फडके यांनी नमूद केले.

दृष्टिक्षेपात...

- 19 वर्षांखालील मुलांच्या शिबिरासाठी 27 खेळाडू

- सीनियर महिलांच्या शिबिरात 29 क्रिकेटपटू

- महिलांची वन-डे स्पर्धा 21 सप्टेंबरपासून

- मुलांची विनू मांकड करंडक स्पर्धा 28 सप्टेंबरपासून

- राजेश कामत तिसऱ्यांदा ज्युनियर संघ प्रशिक्षक

- यापूर्वी 2019-20, 2020-21 मोसमासाठीही नियुक्ती

- अनंत तांबवेकर दुसऱ्यांदा महिला संघ प्रशिक्षक

- यापूर्वी 2019-20 मोसमात मार्गदर्शन

Goa Cricket:  U-19 cricket players with office bearers at Porvorim
IND vs ENG: ऋषभ पंत कोरोना मुक्त, लवकरच होणार भारतीय संघात सामिल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com