Goa Cricket: गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी भास्कर पिल्लई यांची निवड

Goa Cricket: गोवा क्रिकेट असोसिएशनकडून निवडीवर शिक्कामोर्तब; गोलंदाजी मार्गदर्शनासाठी मन्सूर अलीस प्राधान्य
Goa Cricket: K. Bhaskar Pillai
Goa Cricket: K. Bhaskar PillaiFile Photo
Published on
Updated on

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) आगामी मोसमातील रणजी करंडक (Ranji Trophy) क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्लीचे (Delhi) माजी प्रतिथयश फलंदाज आणि अनुभवी प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई (K. Bhaskar Pillai) यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. गोलंदाजी मार्गदर्शनाखाली कर्नाटकचे माजी रणजीपटू मन्सूर अली खान यांना प्राधान्य देण्यात आले असून त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. जीसीएची शुक्रवारी बैठक झाली, त्यावेळी भास्कर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Goa Cricket: K. Bhaskar Pillai
Goa Cricket: नेट शिबिरासाठी शिखा पांडेची उत्सुकता

जीसीए सचिव विपुल फडके यांनी सांगितले, की ``आज आमची बैठक झाली. त्यात मी स्वतः, संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर, खजिनदार परेश फडते, क्रिकेट प्रशिक्षण-ऑपरेशन्स संचालक प्रकाश मयेकर यांनी भाग घेतला. यावेळी आभासी पद्धतीने भास्कर पिल्लई, मुंबईचे सुलक्षण कुलकर्णी व संदीप दहाड, मन्सूर अली, ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू शॉन टेट यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यानंतर रणजी प्रशिक्षकपदासाठी भास्कर यांना नियुक्त करण्याचे ठरले, तर गोलंदाजी प्रशिक्षणासाठी मन्सूर अली यांच्या नावाची चर्चा झाली. भास्कर यांनी आपण प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याचे कळविले आहे. गोलंदाजी प्रशिक्षकाकडे जीसीए अकादमीतील सर्व वयोगट, तसेच सीनियर संघातील गोलंदाजी प्रशिक्षणाची जबाबदारी दिली जाईल.``

Goa Cricket: K. Bhaskar Pillai
IND vs SL 3rd ODI: भारतीय संघात मोठा बदल; या पाच खेळाडूंची झाली 'एन्ट्री'

अनुभवी मार्गदर्शक

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेले 58 वर्षीय कृष्णन पिल्लई (के. पी.) भास्कर रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीतर्फे दिर्घकाळ खेळले. ते शैलीदार तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखले जात. ते दिल्लीचे माजी कर्णधारही आहेत. 95 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत त्यांनी 52.84च्या सरासरीने 5443 धावा केल्या. सर्वाधिक नाबाद 222 धावा करताना 18 शतके व 21 अर्धशतके ठोकली, पण ते भारताकडून कसोटी-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकले नाही. 1985 ते 1991 या कालावधीत ते राखीव खेळाडूंत राहिले. निवृत्तीनंतर 2007 पासून ते प्रशिक्षणात कार्यरत आहेत. दशकभरापूर्वी ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) लेव्हल बी प्रशिक्षक बनले. त्यांनी आतापर्यंत दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, त्रिपुराच्या रणजी संघाला मार्गदर्शन केले आहे. ते प्रशिक्षक असताना उत्तराखंडने 2018-19 मोसमात रणजी पदार्पणात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीने 2017-18 मोसमात सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धा जिंकली, तर रणजी स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्यांनी फलंदाजी सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे.

``आम्ही प्रशिक्षकाची नियुक्ती करताना दीर्घकालीन योजना आखल्या आहेत. आता आमचे लक्ष्य रणजी स्पर्धेच्या एलिट ब गटात प्रवेश करण्याचे आहे.``

-सूरज लोटलीकर,

अध्यक्ष गोवा क्रिकेट असोसिएशन

Goa Cricket: K. Bhaskar Pillai
India vs Sri Lanka: राहुल द्रविडने दीपक चहरला दिला होता कानमंत्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com