पणजीः गोव्याचा बुद्धिबळपटू (Goa Chess) एथन वाझ (Ethan Vaz) विश्वकरंडक युवा बुद्धिबळ (World Cup Youth Chess) स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत 10 वर्षांखालील गटात खेळताना चमकदार खेळाची मालिका त्याने राखली. एथनने विश्वकरंडक स्पर्धेच्या 12 वर्षांखालील गटातील मुख्य फेरीसाठीही पात्र ठरला आहे, मात्र त्याने 10 वर्षांखालील गटात खेळण्यास प्राधान्य दिले. हा निर्णय सार्थ ठरविताना सासष्टी तालुक्यातील राय येथील या प्रतिभाशाली बुद्धिबळपटूने उपउपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या माओ डागी याच्यावर 1.5-0.5 गुणफरकाने मात केली.
उपांत्यपूर्व फेरीत एथनला कडवे आव्हान मिळाले, अखेरीस टायब्रेकर डावात बाजी मारत गोमंतकीय खेळाडूने अर्जेंटिनाच्या ऑगस्टिन दुआर्त याच्यावर 2-1 फरकाने विजय नोंदविला. उपांत्य फेरीत एथनसमोर रशियाच्या मॅटफे युरासोव याचे आव्हान असेल. विश्वकरंडक स्पर्धेची मुख्य फेरी बाद फेरी पद्धतीने सुरू आहे. त्यात 16 खेळाडूंनाच पात्रता मिळाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सफल कामगिरीच्या बळावर एथनने विश्वकरंडक स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी 10 व 12 वर्षांखालील गटात पात्रता मिळविली होती. दोन्ही स्पर्धांचे वेळापत्रक जोडून आल्याने अखेर एथनने 10 वर्षांखालील गटात खेळण्याचे ठरविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.