Goa Chess: गोव्याचा एथन आशियाई स्पर्धेस पात्र

Goa Chess: राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी
Goa Chess: Ethan Vaz
Goa Chess: Ethan VazDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः गोव्याच्या (Goa) एथन वाझ (Ethan Vaz) याने चमकदार खेळाची मालिका कायम राखताना 11 वर्षांखालील राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत (National School Chess Championship) अपराजित कामगिरी नोंदविली. त्याने आठ गुणांची कमाई करत संयुक्त अव्वल स्थान मिळविले, मात्र टायब्रेकर गुणांत त्याला चौथा क्रमांक मिळाला, मात्र या युवा बुद्धिबळपटूने आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी (Asian School Chess Championship) पात्रता निश्चित केली. स्पर्धेत देशभऱातील 582 खेळाडूंनी भाग घेतला. नऊ फेऱ्यांची ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने झाली. त्यात एथनने सात विजय व दोन बरोबरी नोंदवत आठ गुणांची कमाई केली. एथनसह एकूण सहा खेळाडूंचे समान गुण झाले. त्यानंतर अंतिम क्रमवारीसाठी टायब्रेकर गुणांची मदत घ्यावी लागली. सध्या एथन चौथ्या क्रमांकावर असला, तरी ब्राँझपदकाची तो अपेक्षा बाळगून आहे. तिसऱ्या क्रमांकावरील तमिळनाडूच्या एस. दर्शन याने शिस्तबद्ध खेळाचे उल्लंघन केल्यामुळे एथनला संधी आहे. यासदर्भात त्याने दाद मागितली आहे. यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

Goa Chess: Ethan Vaz
International Chess Day: बुद्धिबळाच्या ‘चौरसा’त म्हामल-सारिपल्ली कुटुंब

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चौथा क्रमांक मिळाल्यामुळे एथन आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. 11 वर्षांखालील गटातील ही स्पर्धा या महिनाअखेरीस होणार आहे, अशी माहिती गोवा बुद्धिबळ संघटनेचे (Goa Chess Association) सचिव किशोर बांदेकर यांनी दिली. आशियाई बुद्धिबळ महासंघ आणि फिडेच्या मान्यतेने ही स्पर्धा फिलिपिन्स राष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ घेणार आहे. आशियाई स्पर्धेसाठी पात्रता मिळविल्यानंतर एथनने या कामगिरीचे श्रेय आपली शाळा सां जुझे द आरियल स्कूल व प्रशिक्षक मडगाव येथील चेस गुरू गोवा अकादमीचे प्रकाश विक्रम सिंग यांना दिले आहे. द किंग्ज स्कूलचे अध्यक्ष मेल्विन परेरा, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर, खजिनदार विश्वास पिळर्णकर यांनी अभिनंदन केले आहे. एथनची कामगिरी उत्कृष्टतेचा नमूना असल्याचे मेल्विन यांनी नमूद केले.

Goa Chess: Ethan Vaz
Tokyo Olympics निमित्त गोव्यात जागृती; राज्यभरात क्रीडा चळवळ उभारणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com