Danushka Da Gama Dainik Gomantak
क्रीडा

Goa Boxer : गोव्याच्या बॉक्सरचा आंतरराष्ट्रीय 'पंच'; 'ही' कामगीरी करणारी देशातील पहिली महिला

गोव्याच्या दानुष्का बॉक्सिंगमध्ये यशस्वी

किशोर पेटकर

Goa Boxer : गोव्याच्या दानुष्का दा गामा यांनी बॉक्सिंगमधील आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) परीक्षेत यश प्राप्त केले. त्या देशातील महिला बॉक्सिंग आयटीओ बनल्या आहेत.

आयटीओ परीक्षा थायलंडमधील बँकॉक येथे झाली. त्यात जगभरातील 24 उमेदवारांनी भाग घेतला. भारतीय बॉक्सिंग महासंघातर्फे चार जणांचा समावेश होता. त्यापैकी दानुष्का यांनी आवश्यक निकष पूर्ण करून परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला.

बँकॉक येथे 18 ते 22 जानेवारी या कालावधीत 22 वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग स्पर्धा झाली, त्यावेळी परीक्षा घेण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघातर्फे सोमवारी (ता. १३ फेब्रुवारी) निकाल जाहीर करण्यात आला. दानुष्कासह जगभरातून फक्त सहा जण प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण झाले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

आयटीओ परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे दानुष्का आता जागतिक, तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आयटीओ या नात्याने कार्य बजावू शकतील. भारतीय बॉक्सिंगसाठी दानुष्काची कामगिरी भूषणावह असल्याचे मत गोव्याचे ज्येष्ठ आयटीओ लेनी डिगामा यांनी व्यक्त केली.

बॉक्सिंगमध्ये सुरवातीपासून सक्रिय

दानुष्का या गोव्याच्या माजी महिला बॉक्सरही आहेत. त्या भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या संयुक्त सचिव असून गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT