Stadium
Stadium 
क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy स्पर्धेत गोव्याचा तमिळनाडूवर सनसनाटी विजय

किशोर पेटकर

पणजी: गोव्याने (Goa) सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 (Syed Mushtaq Ali Trophy) क्रिकेट स्पर्धेत सोमवारी सनसनाटी विजय नोंदविला. गतविजेत्या तमिळनाडूस त्यांनी सात विकेट राखून हरविले. एलिट गट अ सामना लखनौ (Lucknow) येथील भारतरत्न श्री अटलबिहारी बाजपेयी (Atal Bihari Vajpayee) एकाना स्टेडियमवर झाला. गोव्याच्या गोलंदाजांनी सुरेख मारा केला. त्यामुळे प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या तमिळनाडूस 9 बाद 136 धावाच करता आल्या. नंतर शुभम रांजणे (Shubham Ranjane) (52) याचे नाबाद अर्धशतक, तसेच त्याने सलामीचा आदित्य कौशिक (41) व सुयश प्रभुदेसाई (नाबाद 43) यांच्यासमवेत केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे गोव्याने सामना आठ चेंडू राखून जिंकला. स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद करताना गोव्याने 18.4 षटकांत 3 बाद 140 धावा केल्या. गोव्याचा स्पर्धेतील शेवटचा सामना मंगळवारी महाराष्ट्राविरुद्ध होईल. गोव्याचे आता चार लढतीनंतर प्रत्येकी दोन विजय व पराभवामुळे आठ गुण झाले आहेत. तमिळनाडूस सलग तीन विजयानंतर पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचे 12 गुण कायम राहिले.

एका षटकात तीन विकेट

तमिळनाडूची एकवेळ 5 बाद 56 अशी घसरगुंडी उडाली होती. त्यानंतर संजय (38) व शाहरूख खान (26) यांनी सहाव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केल्यामुळे तमिळनाडूला सव्वाशे धावांचा टप्पा गाठता आला. मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीकांत वाघ याने टाकलेले 19 वे षटक नाट्यमय ठरले. तिसऱ्या चेंडूवर त्याने शाहरुखला दीपराज गावकर याच्याकरवी झेलबाद केले. नंतर चौथ्या चेंडूवर संजयला त्रिफळाचीत बाद केले. पुढच्या चेंडूवर त्याची हॅटट्रिक हुकली, पण षटकातील शेवटच्या चेंडूवर श्रीकांतने एम. महंमदला बदली खेळाडू मलिक शिरूर याच्याकरवी झेलबाद केले. श्रीकांतने 36 धावांत 4 गडी बाद केले.

गोव्याची दमदार फलंदाजी

गोव्याच्या डावाची सुरवात खराब झाली. पहिल्याच षटकात दोन झटके बसले. पी. सरावानकुमार याने डावातील पहिल्याच चेंडूवर एकनाथ केरकर याला त्रिफळाचीत बाद केले, नंतर चौथ्या चेंडूवर त्याने लक्षय गर्ग याला अशाचप्रकारे बाद केल्याने गोव्याची 2 बाद 4 धावा अशी दाणादाण उडाली. त्यानंतर आदित्य कौशिक व शुभम रांजणे यांनी दमदार फलंदाजी करून गोव्याचा डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. बाराव्या षटकात आदित्य बाद झाल्यानंतर सुयश प्रभुदेसाईने शुभमला समर्थ साथ दिली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची अभेद्य भागीदारी करून गोव्याला संस्मरणीय विजय मिळवून दिला. गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना सुयशने रघुपती सिलांबरासन याला षटकार खेचला. त्याने 24 चेंडूंतील खेळात 1 चौकार व 3 षटकार मारले. शुभमने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक नोंदविताना 42 चेंडूंतील खेळीत 3 चौकार व 2 षटकार लगावले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

SCROLL FOR NEXT