Gautam Gambhir Dainik Gomantak
क्रीडा

'सोशल मीडियावर दिसले, ते...' Asia Cup दरम्यान प्रेक्षकांसमोर 'त्या' कृतीबद्दल गंभीरचे स्पष्टीकरण

Gautam Gambhir: आशिया चषक स्पर्धा सुरु असतानाच गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्याबद्दल त्यानेच स्पष्टीकरण दिले आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir on his gesture in viral video during Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेत सोमवारी (4 सप्टेंबर) भारताने नेपाळविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, ज्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गंभीरने त्याच्या कृतीचे स्पष्टीकरण दिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत होते की आशिया चषकातील एक सामना पावसामुळे थांबलेला असताना गौतम गंभीर स्टेडियममध्ये फोनवर बोलत चालत जात आहे.  त्याचवेळी 'कोहली...कोहली' असा आवाज येत आहे. यानंतर अचानक गंभीरने अश्लील हातवारे केले.

या व्हिडिओनंतर गंभीरने कोहलीचे नाव ऐकून अवमानजनक हातवारे केले असल्याचा अंदाज अनेक चाहत्यांनी लावला. मात्र गंभीरने त्याच्या कृतीमागील कारण स्पष्ट केले आहे.

सध्या आशिया चषकात समालोचक म्हणून काम करत असलेला गंभीरने एएनआयशी बोलताना सांगितले की 'जे सोशल मीडियावर दिसत आहे, ते खरे नाही. कारण लोक त्यांना हवं ते दाखवतात.'

'जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामागील सत्य सांगायचे झाले, तर जर तुम्ही भारताविरोधी घोषणा दिल्या आणि काश्मिरबद्दल बोलत असाल, तर समोरचा व्यक्ती नक्कीच प्रतिक्रिया देईल, तो हसून निघून जाणार नाही.'

'तिथे २-३ पाकिस्तानी लोक होते, जे भारताविरोधात आणि काश्मिबद्दल बोलत होते. त्यामुळे ती माझी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. मी माझ्या देशाविरुद्ध काहीही ऐकू शकत नाही. त्यामुळे माझी ती प्रतिक्रिया होती.'

याशिवाय गंभीरने सोशल मीडियावरही पोस्ट शेअर करत व्हायरल व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने लिहिले की 'सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं. सर्वच दिसते तसे नसते. आपल्या देशाविरुद्ध ज्याप्रकारे घोषणा देण्यात आल्या, त्यावर कोणत्याही भारतीयाने माझ्यासारखीच प्रतिक्रिया दिली असती. मला आपले खेळाडू आणि माझा देश आवडतो.'

दरम्यान, हा व्हिडिओ आशिया चषक स्पर्धेदरम्यानचा असला, तरी कोणत्या सामन्यादरम्यानचा आहे, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, अनेक सोशल मीडिया युजर्सच्या म्हणण्यानुसार शनिवारी (2 सप्टेंबर) झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे.

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

SCROLL FOR NEXT