Gautam Gambhir: विराट अन् धोनीबरोबर नाते कसे? गंभीरचा मोठा खुलासा; नवीनला पाठिंबा देण्याचं कारणंही सांगितलं

गौतम गंभीरने त्याचे विराट कोहली आणि एमएस धोनीबरोबर कसे संबंध आहेत, याबद्दल खुलासा केला आहे.
Gautam Gambhir | MS Dhoni | Virat Kohli
Gautam Gambhir | MS Dhoni | Virat KohliDainik Gomantak

Gautam Gambhir opened up on relationship with Virat Kohli and MS Dhoni: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर अनेकदा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान त्याचे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीबरोबर वाद झाल्यानंतर बराच चर्चेत आला होता. यानंतर त्याचे विराट कोहलीबरोबर आणि एमएस धोनीबरोबर कसे संबंध आहेत, याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे.

गंभीर अनेकदा 2011 वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण श्रेय एमएस धोनीला देण्याबद्दल टीका करत असतो. तसेच गंभीरचे विराटबरोबर आयपीएल 2023 पूर्वी आयपीएल 2013 मध्येही वाद झाले होते. असे असताना त्याचे या दोन क्रिकेटपटूंबरोबर कसे संबंध आहे, असा प्रश्न अनेक चाहत्यांना प्रश्न पडतो. याबद्दल आता गंभीरनेच उत्तर दिले आहे.

Gautam Gambhir | MS Dhoni | Virat Kohli
Gautam Gambhir: 'भारतात संघापेक्षाही एकाच खेळाडूला अधिक महत्त्व, म्हणूनच ICC ट्रॉफी...' गौतम गंभीर बरसला

लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक असलेल्या गंभीरचे आणि याच संघात खेळणारा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणाऱ्या विराटबरोबर भांडणे झाली होती.

याबद्दल गंभीर म्हणाला, 'नवीन उल हक त्याच्या जागेवर बरोबर होता, म्हणून मी त्याची साथ दिली. इथे गोष्ट फक्त नवीनची नाही, जोपण योग्य असेल, त्याला मी शेवटपर्यंत साथ देईल.'

तसेच गंभीरने पुढे सांगितले, 'लोक अनेकदा मला विचारतात की माझे कोहली आणि धोनी यांच्याबरोबरचे नाते कसे आहे? मी हेच सांगतो की माझे दोघांबरोबरही सारखेच संबंध आहेत. जर आमच्यात काही मतभेद असतील, तर ते फक्त मैदानातच राहतात.'

'आमचे हे काही वैयक्तिक मतभेद नाहीत. मैदानात माझ्याप्रमाणेच ते दोघेही जिंकण्यासाठीच उतरलेले असतात. मी विराटने देशासाठी आजपर्यंत जे काही केले आहे, त्याचा सन्मान करतो.'

Gautam Gambhir | MS Dhoni | Virat Kohli
Gautam Gambhir Vs Virat Kohli:...जेव्हा गौतम गंभीरने 'मॅन ऑफ द मॅच' चा किताब विराटला दिला, आता 36चा आकडा का?

याशिवाय गंभीरने असंही म्हटले आहे की भारतात संघापेक्षा एखाद्या खेळाडूलाच अधिक महत्त्व दिले जाते. त्याने यासाठी मोहिंदर अमरनाथ यांचेही उदाहरण सांगितले. त्याने म्हटले की 1983 वर्ल्डकपमध्ये उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या मोहिंदर अमरनाबजद्दल फार कमी वेळा बोलले जाते, नेहमी फक्त कपिल देव यांनी ट्रॉफी उचललेला फोटो दाखवला जातो.

याशिवाय त्याने म्हटले आहे की भारतीय मीडिया आणि ब्रॉडकास्टर एखाद्या खेळाडूसाठी पीआरसारखं काम करतात.

दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गंभीर 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. त्याने एकूण 242 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 10 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com