Gautam Gambhir: 'भारतात संघापेक्षाही एकाच खेळाडूला अधिक महत्त्व, म्हणूनच ICC ट्रॉफी...' गौतम गंभीर बरसला

गौतम गंभीरने भारतात खेळाडूला संघापेक्षाही मोठा बनवण्यामागे पीआर टीम असल्याचे परखड मत मांडले आहे.
Gautam Gambhir
Gautam Gambhir Dainik Gomantak
Published on
Updated on

Gautam Gambhir Statement: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला २०९ धावांनी पराभूत करत विजेतेपद मिळवले. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या दिल्लीचा खासदार गौतम गंभीरने भारतात ज्याप्रकारे एकाच खेळाडूला महत्त्व दिले जाते, त्याबद्दल परखड मत मांडले आहे.

तसेच गंभीरने एमएस धोनीचे नाव न घेता असेही म्हटले की त्याच्या पीआर टीमने त्याला 2007 आणि 2011 वर्ल्डकपचा हिरो बनवले.

Gautam Gambhir
Gambhir-Rohit Video: विराटला नडणाऱ्या गंभीरची रोहितबरोबर दिसली घट्ट मैत्री, चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

गंभीर न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'मला खात्री नाही, पण युवराज भारताने जिंकलेल्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये मालिकावीर होता (वास्तविक 2011 वनडे वर्ल्डकपमध्ये युवराजने आणि 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये शाहिद आफ्रिदीने मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.)'

'पण दुर्दैवाने जेव्हाही आपण 2007 आणि 2011 वर्ल्डकपमध्ये बोलतो, तेन्हा युवराजचे नाव घेत नाही, माझेही नाही. हे फक्त आणि फक्त मार्केटिंग आणि पीआर आहे, जे एका व्यक्तीला मोठा दाखवते आणि बाकी लोकांना त्याच्यापेक्षा लहान.'

'कोणीही कमी दर्जाचे नाही, हे फक्त पीआर आणि मार्केटिंग आहे. 2007 आणि 2011 वर्ल्डकप कोणी जिंकला हे आपल्याला सांगण्यात येते, पण तो फक्त एक व्यक्ती नव्हता तर संपूर्ण संघ होता. कोणतीही व्यक्ती एकटा मोठी स्पर्धा जिंकू शकत नाही. तसे झाले असते तर भारताला 5-10 वर्ल्डकप मिळाले असते.'

याशिवाय गंभीर असेही म्हणला की भारत हा व्यक्तीपूजा करणारा देश आहे. गंभीर म्हणाला, 'अनेक लोक हे बोलणार नाही, पण मी हे सांगत आहे कारण ते जगासमोर यायला पाहिजे. आपला देश हा संघावर प्रेम करण्यापेक्षा व्यक्तीपूजा करणारा देश आहे.'

'आपण खेळाडूला संघापेक्षाही मोठा मानतो. बाकी देशांमध्ये, जसे की इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संघ खेळाडूपेक्षा मोठा आहे. पण भारतीय क्रिकेटमधील सर्व स्टेकहोल्डर्स, ब्रॉडकास्टर आणि मीडियापासून प्रत्येकजण पीआर बनून राहिले आहेत.'

'जर ब्रॉडकास्टर तुम्हाला श्रेय देत नसेल, तर तुम्हाला नेहमी कमी लेखले जाईल. हे सर्वात मोठे सत्य आहे. याचमुळे आपण दीर्घकाळापासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेलो नाही. आपण खेळाडूला अधिक महत्त्व देतो.'

Gautam Gambhir
Virat vs Gambhir: भांडणावेळी नक्की विराट-गंभीरमध्ये काय झालेला संवाद? समोर आले सत्य

याशिवाय गंभीरने 1983 वर्ल्डकपचेही उदाहरण दिले आहे. तो म्हणाला, 'किती जणांना मोहिंदर अमरनाथ यांची वर्ल्डकपमधील कामगिरी लक्षात आहे. तुमाही फक्त कपिल देव यांचा ट्रॉफी उचलतानाचा फोचो पाहिला असेल.'

'मोहिंदर अमरनाथ उपांत्य सामना आणि अंतिम सामन्यात सामनावीर होते. तुम्हाला हे माहित आहे का? हीच समस्या आहे. आत्तापर्यंत फक्त 1983 वर्ल्डकपचा एक फोटो दाखवण्यात येतो, ज्यात कपिल देव ट्रॉफी उंचावत आहेत. कधीतरी मोहिंदर अमरनाथ यांनीही दाखवा.'

याशिवाय गंभीरने असेही म्हटले आहे की त्याचे विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. मतभेद फक्त मैदानात असून मैदानाबाहेर नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com