Durand Cup Football Trophies Dainik Gomantak
क्रीडा

Football : एफसी गोवाचे यंदा ‘डुरँड’ पदार्पण

Football : येत्या पाच सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर कालावधीत कोलकात्यात स्पर्धा

दैनिक गोमंतक

पणजीः आशियातील सर्वांत जुनी असलेल्या ड्युरँड कप फुटबॉल (Durand Cup Football) स्पर्धेत यंदा इंडियन सुपर लीग (Indian Super League) संघ पदार्पण करणार आहेत, त्यात एफसी गोवाचाही (FC Goa) समावेश आहे. स्पर्धेची 130वी आवृत्ती कोलकाता येथे येत्या पाच सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल. कोविड-19 महामारीमुळे ही जुनीपुराणी स्पर्धा गतवर्षी झाली नव्हती, यंदा आयएसएल संघांसह पुनरागमन करत आहे. स्पर्धेत पाच आयएसएल आणि तीन आय-लीग संघांनी सहभाग पक्का केल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी सोमवारी दिली. सशस्त्र दलातर्फे भारतीय लष्कर या स्पर्धेचे आयोजन करते. पश्चिम बंगाल सरकार स्पर्धेचे यंदा संयुक्त आयोजक आहेत.

एफसी गोवा, बंगळूर एफसी, केरळा ब्लास्टर्स, जमशेदपूर एफसी, हैदराबाद एफसी या आयएसएल संघासह कोलकात्यातील मोहम्मेडन स्पोर्टिंग, गत आय-लीग विजेता गोकुळम केरळा, दिल्लीचा सुदेवा एफसी हे आय-लीग संघ ड्युरँड कपसाठी खेळतील. राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय विभागातील एफसी बंगळूर युनायटेड व दिल्ली एफसी हे अन्य संघ आहेत, तसेच भारतीय लष्कराचे रेड व ग्रीन हे दोन संघ, भारतीय हवाई दल, नौदल, सीआरपीएफ, आसाम रायफल्स हे संघही राऊंड ऑफ 16 फेरीत खेळतील. कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, मोहन बागान क्लब मैदान, कल्याणी म्युनिसिपल स्टेडियमवर सामने होतील. स्पर्धेतील विजेत्या संघास तीन करंडक दिले जातील. यामध्ये ड्युरँड कप व शिमला ट्रॉफ फिरत्या स्वरूपात, तर अध्यक्षीय करंडक कायम स्वरूपी असेल.

ड्युरँड कप स्पर्धेविषयी...

- जगातील तिसऱ्या क्रमांकाची, तर आशियातील सर्वांत जुनी फुटबॉल स्पर्धा

- पहिल्यांदा 1888 साली शिमला येथे आयोजन

- प्रारंभी आर्मी कप या नावाने खेळली जाणारी स्पर्धा ब्रिटिश इंडियन आर्मी संघासाठी मर्यादित

- त्यानंतर इतर नागरी संघांचाही स्पर्धेत सहभाग

- ब्रिटिश इंडियाचे परदेश सचिव सर मॉर्टिमेर ड्युरँड यांच्या नावे करंडकाचे नामकरण

-मोहन बागान व ईस्ट बंगाल हे कोलकात्यातील संघ सर्वाधिक प्रत्येकी 16 वेळा विजेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

SCROLL FOR NEXT