Indian Super League: एफसी गोवाच्या भात्यात नवे स्पॅनिश अस्त्र

Indian Super League: आगामी मोसमासाठी आघाडीफळीत आंगुलोच्या जागी काब्रेरा करारबद्ध
Indian Super League: Airam Cabrera
Indian Super League: Airam CabreraDainik Gomantak

पणजीः एफसी गोवाने (FC Goa) आगामी मोसमासाठी आक्रमण धारदार करण्याच्या उद्देशाने स्पॅनिश आघाडीपटू येराम काब्रेरा (Spanish Striker Airam Cabrera) याला करारबद्ध केले आहे. ३३ वर्षीय स्ट्रायकर गतमोसमातील इगोर आंगुलो याची जागा घेईल. गतमोसमातील इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत स्पॅनिश स्ट्रायकर आंगुलो याने 14 गोलसह गोल्डन बूटचा मान मिळविला होता. मात्र नंतर प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी त्याला निवडले नाही, त्यावरून त्याचे आणि एफसी गोवाचे संबंध ताणले. यंदाच्या आयएसएल मोसमासाठी आंगुलोने मुंबई सिटी एफसीशी करार केला आहे, तर एफसी गोवाने आघाडीपटूचे रिकामी जागा भरताना काब्रेरा याची निवड केली.

Indian Super League: Airam Cabrera
Indian Super League: एफसी गोवाचा मोसमपूर्व सराव सुरू

‘‘माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी एफसी गोवाचा आभारी आहे. माझ्या आयुष्यातील हा आणखी एक अद्‍भूत अध्याय असल्याचे मी मानतो. भारतात खेळताना मी आशावादी आहे आणि मला विस्मयकारक गोव्याचा अनुभव घ्यायचा आहे. येथे येताना मी अतिशय आनंदित आहे,’’ अशी प्रतिक्रिया काब्रेरा याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. युरोपमध्ये खेळताना मिळालेला अनुभव आणि गोल नोंदवून प्रगती साधणाऱ्या या संघाला मदत करण्यास इच्छुक असल्याचेही त्याने नमूद केले. ‘‘मला खूप चांगले वाटत आहे. प्रेरितही झालोय. मी गृहपाठ केलाय. क्लबच्या फुटबॉलप्रती तत्त्वज्ञानाशी मी सांगड घालू शकत असल्याचे जाणतोय,’’ असेही तो म्हणाला. येराम काब्रेरा याच्यावर गेले वर्षभर क्लबचे लक्ष होते. आमच्या शैलीशी समर्पक असलेला तो फुटबॉलपटू आहे, असे नव्या स्पॅनिश खेळाडूचे संघात स्वागत करताना एफसी गोवाचे उपाध्यक्ष (रणनीती) रवी पुस्कुर यांनी सांगितले.

Indian Super League: Airam Cabrera
Indian Super League: ग्लॅन मार्टिन्सवर एफसी गोवाचा पूर्ण विश्वास

अनुभवी फुटबॉलपटू

काब्रेरा अनुभवी व्यावसायिक फुटबॉलपटू आहे. युरोपमधील अव्वल लीग स्पर्धेत तो खेळला असून स्पेन, तसेच पोलंडमधील एक्स्ट्राक्लासा, तसेच सायप्रसमधील स्पर्धेत छाप पाडली आहे. काब्रेरा याने स्पेनमधील सीडी टेनेरिफे संघातर्फे कारकिर्दीस सुरवात केल्यानंतर व्हिलारेयाल ब, कोर्डोबा, नुमान्सिया, लुगो, काडिझ, एक्स्ट्रेमाडुर आदी संघांचे प्रतिनिधित्व केले. पोलंडमध्ये विस्ला प्लोक, क्राकोव्हिया, कोरोना किएल्से आदी संघातर्फे खेळताना एक्स्ट्राक्लासा स्पर्धेतील 60 लढतीत 30 गोल आणि 4 असिस्ट अशी कामगिरी केली.

Indian Super League: Airam Cabrera
FC Goa : कुणालचा चाहता ते खेळाडू प्रवास

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com