Hockey Women India X/TheHockeyIndia
क्रीडा

Hockey Olympic Qualifiers: मिशन पॅरिस ऑलिम्पिक! भारतीय महिला संघ रांचीत खेळणार क्विलिफायर, पाहा वेळापत्रक

India Women Hockey Team: पॅरिस ऑलिम्पिकसाठी महिला हॉकी संघाची क्वालिफायर स्पर्धा भारतात शनिवारपासून सुरू होत आहे.

Pranali Kodre

FIH Hockey Olympic Qualifiers Ranchi 2024, India Women Team Schedule:

एफआयएच हॉकी ऑलिम्पिक क्वालिफायर रांची 2024 या स्पर्धेत भारतीय महिला संघाची मोहिम शनिवारी (13 जानेवारी) सुरू होत आहे. ही स्पर्धा यावर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी महत्त्वाची स्पर्धा आहे.

भारतीय महिला संघ गेल्यावर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. त्यामुळे ऑलिम्पिक 2024 साठी थेट पात्र ठरण्याची संधी भारतीय महिला संघाने गमावली होती. त्यामुळे आता रांचीत होणाऱ्या क्वालिफायर स्पर्धेतून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

ही स्पर्धा यापूर्वी चीनमध्ये होणार होती. मात्र हॉकी इंडियाने एफआयएचला विनंती केली की चीनचा महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरला आहे. त्यामुळे ही स्पर्धा भारतात हलवली जावी.

दरम्यान, आता रांचीला होणाऱ्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून चार-चारच्या गटात या संघांना विभागण्यात आले आहे. अ गटात जर्मनी, चिली, झेक प्रजासत्ताक आणि जपान या संघांचा समावेश आहे, तर ब गटात भारतासह इटली, न्यूझीलंड आणि अमेरिका हे संघ आहेत.

ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिले तीन संघ थेट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत.

दरम्यान, पुरुषांची क्वालिफायर स्पर्धा सध्या एक वेलेंसिया, स्पेनला आणि मस्कत, ओमान येथे चालू आहे. भारताचा हॉकी पुरुष संघांने आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यानच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळवला आहे.

भारताचे सामने

तथापि, भारतीय महिला संघाला मात्र रांचीमध्ये आता कमाल करून दाखवावी लागणार आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना अमेरिकेशी शनिवारी होणार आहे. त्यानंतर लगेचच रविवारी (14 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला दुसरा सामना खेळायचा आहे. यानंतर तिसरा साखळी सामना इटलीविरुद्ध 16 जानेवारीला होणार आहे.

त्यानंतर 18 जानेवारीला उपांत्य फेरी खेळवली जाणार आहे. याशिवाय 19 जानेवारीला अंतिम सामना होणार आहे. साखळी फेरीतील भारताचे सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता चालू होणार आहेत.

लाईव्ह स्ट्रिमिंग

हे सामने या स्पर्धेतील भारताचे सामने टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत, तर जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर ऑनलाईन स्ट्रिमिंग होणार आहे.

ऑलिम्पिक क्वालिफायर रांची 2024 स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ -

  • गोलकिपर - सविता (कर्णधार), बिच्छू देवी खारीबम

  • डिफेंडर - निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, मोनिका

  • मिडफिल्डर - निशा, वैष्णवी फाळके, नेहा, नवनीत कौर, सलिमा टेटे, सोनिका, ज्योती, ब्युटी डुंगडुंग.

  • फॉरवर्ड्स - लालरेम्सियामी, संगिता कुमारी, दीपिका, वंदना कटारिया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT