Virat Kohli | Gautam Gambhir Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: विराट-गंभीर पुन्हा भांडण, पण आता व्हिडिओ गेममध्ये! पाहा नक्की भानगड काय

विराट कोहली - गौतम गंभीर पुन्हा आमने-सामने आले आहेत, पण एका वेगळ्या स्वरुपात, जाणून घ्या सविस्तर.

Pranali Kodre

Gautam Gambhir - Virat Kohli Fight Video Game: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम सध्या रोमांचक वळणावर आला आहे. सर्व संघांमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चूरस पाहायला मिळत आहे. अशातच काही वेगळ्या घटनांमुळेही काही सामने आणि खेळाडू चर्चेत येत आहेत. असाच एक सामना 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला होता.

लखनऊला झालेल्या या सामन्यात बेंगलोरने 18 धावांनी विजय मिळवलेला. पण या सामन्यानंतर बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीची लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरबरोबर कडाक्याची भांडणे झाली होती. याबद्दल क्रिकेटविश्वात बरीच चर्चा झाली.

आता व्हिडिओ गेममध्येही भांडण

दरम्यान, विराट आणि गंभीर यांच्यात जी भांडणं झाली, त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. विशेष म्हणजे एका युजरने तर आता या दोघांच्या भांडणाची चक्क व्हिडिओ गेम बनवली आहे. ही ऑनलाईन व्हिडिओ गेम असून कोणीही ही गेम खेळू शकतो. त्यामुळे आता अनेक चाहते ही गेमचा आनंद घेताना दिसत आहेत.

या गेमचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की या गेमच्या सुरुवातीला युजरला विराट आणि गंभीर यांच्यातील एकाचा संघ निवडावा लागणार आहे. त्यानंतर युजर मैदानावर पोहोचेल.

यावेळी एका बाजूला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दुसऱ्या बाजूला लखनऊ सुपर जायंट्स संघ असणार आहे. या दोन्ही संघातील खेळाडूंकडे बॅट असेल, तसेच या दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना बॅटने मारतील. शेवटी ज्या संघाचे सर्व खेळाडू मैदानावर पडतील, तो संघ गेम हरेल. या गेमच्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी गमतीशीर कमेंट्सही केल्या आहेत.

एका युजरने लिहिले की मला वाटले होते कोणीतरी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये विराट आणि गंभीर यांच्यात भांडण घडवेल, पण हा वेगळाच गेम बनवला आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले की 'हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे गंभीरला शांती मिळेल.'

नक्की सामन्यात काय झाले?

1 मे रोजी झालेल्या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना लखनऊकडून अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक फलंदाजी करत होते, तेव्हा विराटचे त्यांच्याशी शाब्दिक वाद झाले.

सामन्यानंतर हा वाद आणखी वाढला. सामना झाल्यानंतरही विराट आणि नवीन यांच्या वाद झाले. तसेच विराटचे काईल मेयर्सबरोबर संभाषणादरम्यान गंभीरने त्याला दूर नेले, परंतु नंतर गंभीर आणि विराट यांच्यातही कडाक्याची भांडणं झाल्याचे पाहायला मिळाले.

या वादानंतर आयपीएलच्या आचार संहितेचा भंग झाल्याच्या कारणाने बीसीसीआयकडून कारवाई झाली. विराट आणि गंभीरवर सामनाशुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तर नवीनवर सामनाशुल्काच्या 50 टक्के दंड झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT