Jofra Archer Out of IPL 2023: मुंबईला धक्का! आर्चरची 'या' कारणामुळे IPL 2023 मधून माघार, बदली खेळाडूचीही घोषणा

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएल 2023 मधून बाहेर झाला आहे.
Jofra Archer
Jofra ArcherDainik Gomantak
Published on
Updated on

Jofra Archer Ruled Out from IPL 2023: इंडियन प्रीमयर लीग 2023 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आलेली असताना मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडला परतला असून आता तो उर्वरित आयपीएल 2023 स्पर्धेसाठी उपलब्ध नसेल.

जोफ्रा आर्चर सध्या त्याच्या उजव्या हाताच्या कोपरावर झालेल्या दुखापतीवर झालेल्या शस्त्रक्रियातून सावरत आहे. त्याचमुळे त्याच्या रिहॅबिलेटेशनवर (दुखापतीतून सावरण्यासाठी लागणारा वेळ) लक्ष केंद्रीत करण्याच्या हेतूने तो इंग्लंडला परतला आहे.

आर्चरने आयपीएल 2023 मध्ये मुंबईसाठी पाच सामनेच खेळले आहेत. त्याने पहिल्या सामन्यानंतर काही काळ विश्रांती घेतली होती.

या दरम्यान बेल्जियममध्ये त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाल्याचे अनेक रिपोर्ट्समधून समोर आले होते. त्यानंतर तो पुन्हा मुंबई संघात परतल्यानंतर 4 सामने खेळला. पण त्याला त्याने खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये केवळ दोन विकेट्सच घेता आल्या.

Jofra Archer
IPL 2023: पंजाबवर घोंगावलं रसेलचं वादळ! रिंकूचा शेवटच्या बॉलवर चौकार अन् कोलाकाताचा विजयावर शिक्कामोर्तब

खरंतर आर्चर गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने दुखापतींचा सामना करत असून त्याच्यावर अनेकदा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण अजूनही तो पूर्ण तंदुरुस्त नसल्याने त्याला इंग्लंडला परत जावे लागले आहे. मुंबईने आर्चरला लिलावातून 8 कोटी रुपयांना खरेदी केले होते.

आता आर्चरच्या जागेवर मुंबई इंडियन्सने उर्वरित आयपीएल 2023 हंगामासाठी इंग्लंड संघातील त्याचाच संघसहकारी ख्रिस जॉर्डनला संघात सामील करून घेतले आहे.

मुंबईने या याबद्दल माहिती दिली आहे की 'उर्वरित हंगामासाठी ख्रिस जॉर्डन मुंबई इंडियन्समध्ये सामील हईल. त्याला जोफ्रा आर्चरच्या जागेवर संघात घेण्यात आले आहे. जोफ्राच्या दुखापतीतून सावरण्यावर आणि तंदुरुस्तीवर इंग्लंड क्रिकेट बोर्ड लक्ष ठेवून आहे. तो त्याच्या रिहॅबवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी इंग्लंडला परत जाईल.'

Jofra Archer
IPL 2023 मध्ये तब्बल 10 देशांच्या खेळाडूंनी जिंकला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार, पाहा संपूर्ण लिस्ट

जॉर्डनला 2 कोटी रुपयांच्या किंमतीत मुंबईने संघात सामील करून घेतले आहे. जॉर्डनला यापूर्वी आयपीएलचा चांगला अनुभव देखील आहे. तो याआधी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे.

त्याने आत्तापर्यंत 28 आयपीएल सामने खेळले असून 9.32 च्या इकोनॉमी रेटने 27 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जॉर्डन फेब्रुवारीमध्ये आयएल टी20 स्पर्धा जिंकणाऱ्या गल्फ जायंट्स संघाचाही भाग होता. त्याने त्या स्पर्धेत 10 डावात 20 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच तो इंग्लंड संघातीलही प्रमुख खेळाडूंपैकी एक राहिला आहे. टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचाही तो भाग होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर टी20 क्रिकेटमध्ये 87 सामने खेळले असून 96 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com