FIFA Women World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA Women World Cup 2023: तिसऱ्या दिवशी रंगला चार सामन्यांचा थरार! या संघांची विजयी सुरुवात

फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धेत तिसऱ्या दिवशी झालेल्या चारही सामन्यांमध्ये विजयी संघ मिळाला.

Pranali Kodre

FIFA Women World Cup 2023, Day 3 Results: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होत असेलल्या फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी तिसरा दिवस पार पडला. तिसऱ्या दिवशी चार सामने पार पडले. यातील चारही सामन्यांचे निकाल लागले आहेत. चारही सामन्यांमध्ये कोणताही सामना बरोबरीत सुटला नाही.

युएसए विरुद्ध व्हिएतनाम

ग्रुप इ मधील युएसए विरुद्ध व्हिएतनाम संघात तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना झाला. या सामन्यात युएसएने 3-0 अशा गोल फरकाने विजय मिळवला आणि आपल्या गुणांचे खातेही उघडले.

युएसएकडून सोफीया स्मिथने सर्वात पहिला 14 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर पहिल्या हाफच्या भरपाई वेळेत तिनेच दुसरा गोल करत युएसएला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. 77 व्या मिनिटाला लिंडसी होरनने युएसएसाठी तिसरा गोल नोंदवला. ही आघाडी मोडणे व्हिएतनामला शक्य झाले नाही आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

झाम्बिया विरुद्ध जपान

दुसरा सामना ग्रुप सी मधील झाम्बिया विरुद्ध जपान संघात झाला. या सामन्यात जपानने पूर्ण वर्चस्व ठेवत 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सुरुवातीला झाम्बियाने जपानचा चांगली लढत दिली होती. 40 मिनिटापर्यंत सामन्यात दोन्ही संघांना गोल करता आला नव्हता. पण 43 व्या मिनिटाला हिनाता मियाझावाने जपानचे खाते उघडले.

त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये तब्बल ४ गोल झाले. जपानकडून मिना तनकाने 55 व्या मिनिटाला, हिनाता मियाझावानेच 62 व्या मिनिटाला, जून एन्डोने 71 मिनिटाला मैदानी गोल केले, तर रिको यूकीने 90 मिनिटाच्या खेळानंतर भरपाई वेळेत 11 व्या मिनिटाला जपानसाठी पेनल्टीवर 5 वा गोल केला. या विजयामुळे जपान सध्या ग्रुप सीमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.

इंग्लंड विरुद्ध हैती

तिसरा सामना ग्रुप डी मधील इंग्लंड विरुद्ध हैती संघात झाला. या सामन्यात इंग्लंडने 1-0 अशा गोलफरकाने जिंकला. इंग्लंडकडून 29 व्या मिनिटाला जॉर्जिया स्टॅनवेने पेनल्टीवर अचूक निशाणा साधत एकमेव गोल नोंदवला. तिचा हा गोल इंग्लंडसाठी महत्त्वाचा ठरला.

डेन्मार्क विरुद्ध चीन

तिसऱ्या दिवसातील चौथा सामनाही डी ग्रुपमधील संघातच पार पडला. हा सामना डेन्मार्क विरुद्ध चीन संघात झाला. या सामन्यात जवळपास 89 व्या मिनिटापर्यंत 0-0 अशी बरोबरी होती.

पण अखेरच्या मिनिटाला डेन्मार्कसाठी एमेलिया वेंग्सगार्डने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. तिचा हा गोल डेन्मार्कला विजयाचे 3 गुण मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे डेन्मार्कने या सामन्यात 1-0 असा विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT