female spectator and police officer fight 
क्रीडा

IPL 2023 फायनलवेळी राडा? महिला प्रेक्षक अन् पोलीस कर्मचाऱ्यांच्या झटापटीचा Video व्हायरल

आयपीएल 2023 अंतिम सामन्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका महिला प्रेक्षक आणि पोलीस कर्मचारी यांच्यात झटापट झाल्याची चर्चा होत आहे.

Pranali Kodre

Female spectator and Police officer fight at Narendra Modi Stadium, Ahmedabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना रविवारी सुरु होणार होता. पण रविवारी संध्याकाळी अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने हा सामना सोमवारी राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, रविवारी हा सामना होईल या आशेने हजारो चाहते स्टेडियममध्ये उपस्थित होते. याचदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ रविवारचा आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यावेळीचा असल्याचा दावा अनेक सोशल मीडिया युजर्सकडून करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला प्रेक्षक आणि एक पोलीस कर्मचारी यांच्यात झटापट झाल्याचे दिसत आहे.

यामध्ये महिला प्रेक्षक पोलीस कर्मचाऱ्याला मारताना आणि ढकलतानाही दिसली आहे. यावेळी इतर प्रेक्षकही ही घटना पाहाताना दिसत आहेत. पण यादरम्यान, नक्की काय घडले याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तसेच ही झटापट कोणत्या कारणाने झाली, हे देखील अद्याप समजलेले नाही.

अंतिम सामना राखीव दिवशी

आयपीएल 2023 मधील चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा अंतिम सामना आता रविवारऐवजी सोमवारी खेळवला जाणार आहे. रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत सामना पाऊस थांबण्याची वाट पाहाण्यात आली. पण पाऊसाच्या सरी कोसळत होत्या. तसेच मैदानही ओले झाल्याने सामनाधिकाऱ्यांनी हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी घेण्याचा निर्णय घेतला.

आता सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून त्यापूर्वी नाणेफेक घेतली जाईल.

तिकिट्स असणाऱ्या चाहत्यांना मिळणार प्रवेश

रविवारी सामना रद्द झाला असला आणि सोमवारी सामना होणार असला, तरी या सामन्यासाठी तिकिट्स घेतलेल्या चाहत्यांची निराशा होणार नाही. कारण बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे की चाहत्यांनी या सामन्यासाठी घेतलेली प्रिंटेड तिकिट्स जपून ठेवा. कारण याच तिकिट्सनुसार चाहत्यांना राखीव दिवशी स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT