गोल नोंदविल्यानंतर आनंदित झालेला एफसी गोवाचा रॉलिन बोर्जिस. Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: धडाकेबाज विजयासह एफसी गोवा अव्वल; चेन्नईयीन एफसीवर 3-0 ने सहज मात

एफसी गोवा आयएसएल स्पर्धेत अपराजित

किशोर पेटकर

Indian Super League Football: एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी धडाकेबाज विजय नोंदवत गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले. चेन्नई येथे त्यांनी चेन्नईयीन एफसीवर 3-0 फरकाने सहज मात केली.

सामन्याच्या पूर्वार्धात मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. 13 व्या मिनिटास बोरिस सिंग याने गोल नोंदविताना जय गुप्ताच्या असिस्टवर अचूक नेम साधला.

नंतर 24 व्या मिनिटास रॉलिन बोर्जिस याने एफसी गोवाची आघाडी वाढविली. यावेळी त्याला कार्ल मॅकह्यू याच्या असिस्टला लाभ झाला. उत्तरार्धात बदली खेळाडू उदांता सिंग याने एफसी गोवाची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. ब्रँडन फर्नांडिसच्या जागी मैदानात आलेल्या उदांताने 72 व्या मिनिटास संधी साधली.

अपराजित वाटचाल

एफसी गोवा आयएसएल स्पर्धेत आता अपराजित आहे. पाच सामन्यांत चार विजय व एका बरोबरीसह त्यांनी 13 गुणांची कमाई केली आहे. केरळा ब्लास्टर्सचेही सहा लढतीनंतर तेवढेच गुण आहेत, मात्र गोव्यातील संघाची +6 अशी सरस गोलसरासरी असल्याचे ते अग्रस्थानी आहेत.

रविवारच्या लढतीपूर्वी सलग दोन सामने जिंकलेल्या ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा लढतीनंतर त्यांचे सहा गुण कायम राहिले.

स्पर्धेतील वर्चस्व कायम

आयएसएल स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांत 26 सामने झाले आहेत. एफसी गोवाने वर्चस्व राखताना 15 सामने जिंकले असून चेन्नईयीनने 9 सामने जिंकले आहेत. दोन लढती बरोबरीत राहिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT