सराव सत्रात खेळाडूंना सूचना करताना एफसी गोवाचे FC Goa प्रशिक्षक डेरिक परेरा (मध्यभागी). Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa: सक्षम मानसिकतेच्या शोधात एफसी गोवा संघ

आयएसएल: प्ले-ऑफची आशा सोडली, जमशेदपूरविरुद्ध कठीण लढत

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघ सध्या संक्रमणातून जात आहे. या संघापाशी समतोल नाही आणि ते सक्षम मानसिकतेच्याही शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल Football स्पर्धेत त्यांना जमशेदपूर एफसीच्या कठीण आव्हानास सामोरे जावे लागेल.(FC Goa team will face tough challenge in eighth Indian Super League football tournament)

जमशेदपूर व एफसी गोवा यांच्यातील सामना शुक्रवारी (ता. 28) बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर खेळला जाईल. जमशेदपूरचे सध्या 19 गुण असून ते प्ले-ऑफ फेरीचे दावेदार आहेत. एफसी गोवा 14 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. जमशेदपूरने पाच सामने जिंकले असून एफसी गोवास FC Goa तीन सामन्यांतच पूर्ण गुण मिळविता आले. पहिल्या टप्प्यात जमशेदपूरने एफसी गोवाचा सहज पराभव केला होता.

प्ले-ऑफ फेरी बिकट: डेरिक

एफसी गोवाच्या सध्याच्या कामगिरीवर भाष्य करताना प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी प्ले-ऑफ फेरी बिकट असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘‘आता पहिल्या चार संघांत जागा मिळविणे कठीण आहे. आम्ही सध्या एकाच सामन्याचे लक्ष्य बाळगत आहोत. आम्ही मेहनत घेत राहू आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी कटीबद्ध राहू. आमच्या संघाची ताकद पाहता, क्रमवारीतील सध्याची जागा अयोग्य आहे.’’जमशेदपूर संघ चांगला आहे, ते शैलीदार खेळतात, असेही डेरिक प्रतिस्पर्ध्यांविषयी म्हणाले. मागील तीन सामने ते विजयाविना आहेत.

क्षमतेनुसार खेळण्याचे आव्हान

एफसी गोवा संघाने स्पर्धेत सातत्य राखलेले नाही, ही चिंता डेरिक यांना सतावत आहे. संघाकडून त्यांना सक्षम मानसिकतेची अपेक्षा आहे. ‘‘क्षमतेनुसार कामगिरी करण्याच्या मानसिकतेसह आम्हाला खेळावे लागेल. आम्ही त्रुटी हेरून उद्याचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करू,’’ अशी ग्वाही डेरिक यांनी दिली. एफसी गोवाने मागील लढतीत बंगळूरला 1-1 गोलबरोबरीत रोखले. मात्र त्या लढतीत जायबंदी झालेल्या ग्लॅन मार्टिन्सला ते शुक्रवारी मुकतील. बंगळूर एफसीविरुद्ध पुनरागमन करताना ब्रँडन फर्नांडिस सात मिनिटे खेळला होता, मात्र तो अजूनही पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही.

जमशेदपूर सेटपिसेसवर प्रभावी

ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसी शुक्रवारी पूर्ण तीन गुणांसाठीच मैदानात उतरेल हे निश्चित. तसे झाल्यास त्यांचे चार संघांतील स्थान भक्कम होईल. हा संघ सेटपिसेसवर प्रभावी ठरलेला आहे. त्यांनी स्पर्धेत 11 गोल सेटपिसेसवर केले आहेत. सात वेळा त्यांनी फ्रीकिकवर चेंडूला नेटमध्ये जागा दिली. ही आकडेवारी एफसी गोवासाठी डोकेदुखी असेल, कारण त्यांचा बचाव सेटपिसेस व्यूहरचनेत कोलमडतो हे मोसमात वारंवार सिद्ध झालेले आहे. ग्रेग स्टुअर्ट याचा एफसी गोवासमोर मोठा धोका असेल. त्याने स्पर्धेत पाच गोल व सहा असिस्टची नोंद केली असून सेटपिसेसवर तो जास्त परिणामकारक ठरला आहे. डॅनियल चिमा चुक्वू याच्या समावेशानेही जमशेदपूरचे आक्रमणही जास्त धारदार झाले आहे.

विलगीकरणानंतर मैदानात

कोविड-19 संसर्ग आणि वैद्यकीय कारणास्तव जमशेदपूरला विलगीकरणात राहावे लागले. सलग दोन सामने जिंकल्यानंतर, त्यांचे दोन सामने लांबणीवर पडले. 11 जानेवारीनंतर शुक्रवारी ते सामन्यासाठी मैदानात उतरत आहेत. ‘‘एफसी गोवाविरुद्धचा सामना अनेक कारणांमुळे आमच्यासाठी कठीण असेल. अनेक दिवस आमच्या खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागले. त्यातून बाहेर पडल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे सराव केला. खेळाडू सावरले असले, तरी एफसी गोवा तुल्यबळ संघ आहे,’’ असे प्रशिक्षक कॉयल म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT