....अजिंक्य रहाणेला दोन वर्षांपूर्वीच टीम इंडियातून डच्चू दिला असता’: माजी सलामीवीर

भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे.
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय कसोटी संघ मालिका जिंकण्याचा दावेदार मानला जात होता, पण घडलं उलटचं. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकूनही टीम इंडियाने 1-2 असा पराभव पत्करुन पुनरागमन केले. मात्र कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) कारकिर्दीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे. (Sanjay Manjrekar Said Ajinkya Rahane Would Have Been Removed From The Team Two Years Ago)

दरम्यान, न्यूज 18 शी बोलताना मांजरेकर म्हणाले, “मी जे म्हणत आहे तो (Third Test against South Africa) सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता, तर मी असं का म्हणत आहे असा प्रश्न लोकांना पडू नये. केवळ धावा काढणे हा मुद्दा नसून मैदानावर खेळाडू कसा खेळतो हे देखील महत्त्वाचे आहे. 2017 सालापासून अजिंक्य रहाणेने असे दाखवून दिले आहे की, त्याला कशाचीच खात्री नाही.

Ajinkya Rahane
शास्त्री मास्तर की जुबानी...'बुमराहला टीम इंडियाचा कर्णधार का बनवू नये'

तसेच, ‘’तो कसा फलंदाजी करतो आणि कसा आऊट होतो हे तुम्ही पाहू शकता. मात्र ही दुसरी गोष्ट आहे जी तुम्हाला खेळाडू कसा खेळतो याची कल्पना देते. उदाहरणार्थ, विराट कोहलीला शतक झळकावता आलेले नाही. परंतु तरीही तो 70 धावा करतो, विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी या धावा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे माझ्यासाठी रहाणे हा असा खेळाडू आहे, ज्याची स्वतःची सेल्फ लाइन आहे. मात्र आता नाहीशी झाली आहे’’ असं देखील मांजरेकर यांनी म्हटलं.

शिवाय, ‘पुजाराचा शंभरावा कसोटी सामना जवळ आला आहे. त्याला संघाबाहेर ठेवण्यासाठी काही गोष्टी बाजूला ठेवून भावनिक विचार करावा लागतो. मी पुजाराला रहाणेपेक्षा थोडा जास्त वेळ दिला असता. त्याची फलंदाजी पाहूनच मी असे बोलत आहे. यामागे दुसरे कोणतेही कारण नाही, पुजारामध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे, असे मला वाटते. परंतु रहाणेला मी निवड समितीत असतो तर दोन वर्षांपूर्वीच त्याला माझ्या योजनेतून वगळले असते,’ असं देखील मांजरेकर यांनी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com