ISL Football  Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एफसी गोवा ‘टॉप सिक्स’मधून बाहेर

नॉर्थईस्टला नमवून ओडिशा प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने

किशोर पेटकर

Indian Super League Football: ओडिशा एफसीने शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेडला नमवून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. त्यांनी आता तीस गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला असून एफसी गोवा संघ सातव्या क्रमांकावर घसरला आहे.

गुवाहाटी येथे झालेल्या लढतीत ओडिशाने ३-१ फरकाने विजय मिळवून स्पर्धेतील नववा सामना जिंकला. त्यामुळे एटीके मोहन बागान संघ २८ गुणांसह सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. पहिल्या सहा संघातून बाहेर पडलेल्या एफसी गोवाचे २७ गुण आहेत.

ओडिशा एफसीचा शेवटचा सामना २२ फेब्रुवारीस जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. प्ले-ऑफ पात्रतेसाठी त्यांना त्या लढतीत बरोबरीही पुरेशी ठरेल. स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी गुणतक्त्यातील सहा संघ पात्र ठरतील. त्यापैकी मुंबई सिटी, हैदराबाद, केरळा ब्लास्टर्स व बंगळूर एफसी या चार संघांनी जागा निश्चित केली आहे.

एफसी गोवाची वाटचाल अवघड

एफसी गोवाची वाटचाल अवघड आहे. त्यांना शेवटच्या लढतीत २३ फेब्रुवारी रोजी बंगळूरला कोणत्याही पराभूत करावे लागेल आणि त्यानंतरही त्यांना एटीके मोहन बागानविरुद्धच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.

ओडिशासाठी जमशेदपूरविरुद्धचा सामना सोपा आहे, तर एटीके मोहन बागानला अजून दोन सामने खेळायचे आहेत. शनिवारी (ता. १८) एटीके मोहन बागान व केरळा ब्लास्टर्स यांच्यात सामना होईल.

या लढतीत कोलकात्यातील संघ पराजित झाला, तरी त्यांच्यासाठी ईस्ट बंगालविरुद्धच्या ‘कोलकाता डर्बी’चा निकाल महत्त्वाचा असेल. शनिवारी एटीके मोहन बागानने विजय नोंदविल्यास ते प्ले-ऑफ फेरीत दाखल होतील आणि एफसी गोवासाठी प्ले-ऑफ फेरी गाठणे अवघड ठरेल.

आयएसएल गुणतक्ता

संघ सामने विजय बरोबरी पराभूत गोलफरक गुण

मुंबई सिटी १९ १४ ४ १ ३४ ४६

हैदराबाद १८ १२ ३ ३ २० ३९

केरळा ब्लास्टर्स १८ १० १ ७ २ ३१

बंगळूर एफसी १९ १० १ ८ २ ३१

ओडिशा १९ ९ ३ ७ ० ३०

एटीके मोहन बागान १८ ८ ४ ६ ४ २८

एफसी गोवा १९ ८ ३ ८ ३ २७

चेन्नईयीन १९ ६ ६ ७ -२ २४

ईस्ट बंगाल १८ ५ १ १२ -१५ १६

जमशेदपूर १८ ३ ४ ११ -१४ १३

नॉर्थईस्ट युनायटेड १९ १ २ १६ -३४ ५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT