Santosh Trophy: केरळ, ओडिशा, कर्नाटक नंतर आता 'या' संघाकडून गोव्याचा पराभव

पंजाबने 3-1 फरकाने गोव्याला नमवले
Santosh Trophy
Santosh TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

माजी विजेत्या गोव्याला 76 व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत सलग चौथा पराभव पत्करावा लागला. भुवनेश्वर येथे शुक्रवारी झालेल्या लढतीत त्यांच्यावर 3-1 फरकाने सहज विजय नोंदवून पंजाबने उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.

स्पर्धेच्या अ गटात पाच वेळच्या विजेत्या गोव्याचा कामगिरी खूपच निराशाजनक ठरली आहे. त्यांनी फक्त चार गोल नोंदविताना तब्बल 12 गोल स्वीकारले आहेत. गोव्याविरुद्ध पूर्ण तीन गुण मिळाल्यामुळे पंजाबचे आता गटात सर्वाधिक 10 गुण झाले आहेत.

त्यांनी स्पर्धेत अपराजित कामगिरी नोंदविताना तीन विजय व एक बरोबरी नोंदविली आहे. गोव्याला यापूर्वी केरळ, ओडिशा व कर्नाटक या संघांकडूनही पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचा शेवटचा सामना रविवारी (ता. 19) महाराष्ट्राविरुद्ध होईल.

Santosh Trophy
Aguada Jail: आग्वाद किल्ल्यातील 'तो' निर्णय म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान

गोव्याच्या निक्सन कास्ताना याने 20 व्या मिनिटास केलेल्या स्वयंगोलमुळे पंजाबला आयती आघाडी मिळाली. उत्तरार्धात सहा मिनिटांत बदली खेळाडू रोहित शेख याने दोन गोल केल्यामुळे पंजाबची आघाडी 3-0 अशी भक्कम झाली. 68 व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या रोहितने अनुक्रमे 74 व 80 व्या मिनिटास गोल केला. क्लेन्सियो पिंटो याने 88 व्या मिनिटास गोव्याची पिछाडी एका गोलने कमी केली.

Santosh Trophy
Financial Scam: आर्थिक घोटाळा करून अनेक महिने पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या

गटातील अन्य लढतीत

अ गटातील अन्य लढतीत शुक्रवारी महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील सामना 3-3 असा गोलबरोबरीत राहिला. इंज्युरी टाईममधील 11व्या मिनिटास गोल नोंदवून कर्नाटकने बरोबरीचा एक गुण प्राप्त केला. केरळने यजमान ओडिशाला 1-0 फरकाने निसटते हरविले. गटात आता पंजाबचे 10, कर्नाटकचे आठ, केरळचे सात, ओडिशाचे चार, तर महाराष्ट्राचे तीन गुण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com