Football
Football  Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाने पेनल्टीसह सामनाही गमावला

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवाच्या आयरम काब्रेरा याचा पेनल्टी फटका मुंबई सिटीचा गोलरक्षक महंमद नवाझ यानेअडविला, त्यानंतर गोव्याच्या संघाला गोलसह पुनरागमन करता आले नाही. गतविजेत्यांनी सामना 2 - 0 असा जिंकत आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहताना चौथा क्रमांक मिळविला. (Indian Super League)

बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर शनिवारी रात्री कॅसियो गॅब्रियल याच्या फ्रीकिकवर मेहताब सिंग याने हेडिंगवर सुरेख नेम साधला. त्यामुळे 35व्या मिनिटास मुंबई सिटीने आघाडी मिळविली. मेहताबचा आयएसएल (ISL) स्पर्धेतील हा पहिलाच गोल ठरला. नंतर 86व्या मिनिटास बदली खेळाडू ब्राझीलियन दिएगो मॉरिसियो याने मुंबई सिटीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने मोसमात दुसऱ्यांदा गोल नोंदवत आयएसएलमधील एकूण वैयक्तिक गोलसंख्या 14 वर नेली.

मुंबई सिटीने स्पर्धेतील नवव्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता 18 लढतीनंतर 31 गुण झाले आहेत. एटीके मोहन बागानचेही तेवढेच गुण आहेत, मात्र कोलकात्याचा संघ सरस गोलसरासरीमुळे तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या स्थानावरील मुंबई सिटीने केरळा ब्लास्टर्सवर (Kerala Blasters) एका गुणाची आघाडी घेतली. मुंबई सिटीचे स्पर्धेतील आणखी दोन सामने बाकी आहेत. स्पर्धेत कमजोर कामगिरी केलेल्या एफसी गोवास नववा पराभव पत्करावा लागला. 19 लढतीनंतर त्यांचे 18 गुणांसह नववा क्रमांक कायम राहिला. सामन्यात उल्लेखनीय खेळ करूनही डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आणखी एक पराभव पत्करावा लागला.

काब्रेराचा नेम चुकला
सामन्याच्या 18व्या मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू आयरम काब्रेरा याचा नेम चुकला. त्यामुळे सामन्याच्या प्रारंभिक टप्प्यात आक्रमक खेळ केलेल्या एफसी गोवास आघाडी घेता आली नाही. मुंबई सिटीचा गोलरक्षक महंमद नवाझ याने प्रतिस्पर्धी खेळाडूस पाडल्यामुळे एफसी गोवास स्पॉट किकचा लाभ झाला. मात्र काब्रेराच्या फटक्यावर नवाझने पायाने चेंडू अडवत अगोदरच्या चुकीची भरपाई केली.


आकड्यांत सामना

- मुंबई सिटीचे स्पर्धेत 34 गोल
- 31 गोल स्वीकारण्याची एफसी गोवावर नामुष्की
- मुंबई सिटीविरुद्ध एफसी गोवा सलग 6 लढती विजयाविना
- मागील 6 लढतीत एफसी गोवाविरुद्ध मुंबई सिटीचे 3 विजय, 3 बरोबरी
- आयएसएलमध्ये मुंबई सिटीचे एफसी गोवाविरुद्ध एकूण 7 विजय
- यंदा पहिल्या टप्प्यातही मुंबईचा संघ गोव्यातील संघाविरुद्ध 3-0 असा विजयी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT