FC Goa defeated Chennaiyin FC in Indian Super League Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: एफसी गोवाच्या विजयाचा शिल्पकार ठरला नोह सादौई!

एफसी गोवाचे पुन्हा वर्चस्व; चेन्नईयीनविरुद्ध आणखी एक सफाईदार विजय

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीवर वर्चस्व राखताना शुक्रवारी रात्री 2-0 फरकाने सफाईदार विजय मिळविला. कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने यंदा स्पर्धेतील सलग दुसरा, तर चेन्नईतील संघाविरुद्ध ओळीने तिसरा सामना जिंकला.

(FC Goa defeated Chennaiyin FC in Indian Super League)

चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत एफसी गोवाने दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल केला. मोरोक्कन विंगर नोह सादौई एफसी गोवाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या क्रॉस पासवर ११व्या मिनिटास रेडीम ट्लांग याने शानदार हेडिंगद्वारे एफसी गोवास आघाडी मिळवून दिली, नंतर माकन चोथे याच्या असिस्टवर नोह याने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल केला. त्यामुळे ९०+१व्या मिनिटास एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. इंज्युरी टाईममधील १२ मिनिटांच्या खेळात चेन्नईयीनला गोल नोंदविणे शक्य झाले नाही.

गतमोसमातील दोन्ही सामन्यांत एफसी गोवाने चेन्नईयीनला नमविले होते. यंदाच्या सुरवातीस हाच धडाका कायम राहिला. अगोदरच्या लढतीत ईस्ट बंगालला पराजित केलेल्या एफसी गोवाचे आता दोन लढतीनंतर सहा गुण झाले आहेत व गुणतक्त्यात पहिल्या स्थानी आले आहेत. आता २९ ऑक्टोबर रोजी अवे सामन्यात एफसी गोवासमोर हैदराबाद एफसीचे आव्हान असेल. एटीके मोहन बागानवर विजय, नंतर बंगळूरला बरोबरीत रोखलेल्या चेन्नईयीन एफसीला पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे चार गुण कायम राहिले. त्यांचा पुढील सामना चार नोव्हेंबरला ईस्ट बंगालविरुद्ध होईल.

गोलरक्षक धीरज जायबंदी

सामन्याच्या पूर्वार्धात एफसी गोवाचा गोलरक्षक धीरज सिंग याची कामगिरी खूपच उल्लेखनीय ठरली, त्यामुळे चेन्नईयीनची आक्रमणे यशस्वी ठरली नाहीत. तासाभराचा खेळ झालेला असताना धीरज जायबंदी झाला, त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदान सोडावे लागले व त्याची जागा बदली गोलरक्षक अर्शदीप सिंग याने घेतली.

आयएसएलमध्ये शनिवारी ‘डबल हेडर’

आयएसएल स्पर्धेत शनिवारी (ता. २२) दोन लढती होतील. मुंबई येथे मुंबई सिटी व जमशेदपूर यांच्यात, तर हैदराबाद येथे हैदराबाद एफसी व बंगळूर एफसी यांच्यात लढत होईल. सध्या मुंबई सिटी, हैदराबाद व बंगळूरचे प्रत्येकी चार गुण असून जमशेदपूरला पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता.

दृष्टिक्षेपात सामना

- उभय संघातील २२ आयएसएल सामन्यांत एफसी गोवाचे १२ विजय

- चेन्नईयीनविरुद्ध एफसी गोवा सलग ४ सामने अपराजित, ३ विजय, १ बरोबरी

- गतमोसमात एफसी गोवा अनुक्रमे १-०, ५-० फरकाने विजयी, त्यापूर्वी २-२ अशी बरोबरी

- चेन्नईयीनविरुद्ध आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे आता ४४ गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT