Intercollegiate Men's Football Tournament: फादर आग्नेल, झेवियर्स, रोझरी उपांत्यपूर्व फेरीत

महाविद्यालयीन फुटबॉल: साखळी, धेंपे, खांडोळा संघाचीही आगेकूच
Father Agnel, Xavier's, Rosary in the quarterfinals
Father Agnel, Xavier's, Rosary in the quarterfinalsDainik Gomantak

पणजी: गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष फुटबॉल स्पर्धेत आगेकूच राखताना फादर आग्नेल, सेंट झेवियर्स, रोझरी महाविद्यालय यांच्यासह साखळी, धेंपे, खांडोळा महाविद्यालयाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेत शुक्रवारी ताळगाव पठार येथील विद्यापीठ मैदानावर फादर आग्नेल महाविद्यालयाने आसगावच्या डीएम्स महाविद्यालयाचा 7-0 फरकाने धुव्वा उडविला.

(Father Agnel, Xavier's, Rosary in the quarterfinals in Intercollegiate Men's Football Tournament)

Father Agnel, Xavier's, Rosary in the quarterfinals
Mapusa Municipal Council: 31 ऑक्टोबरनंतर संपाबाबत निर्णय घेणार; कर्मचारीवर्ग

पूर्वार्धात डेरील सिल्वा, मोहित सांतोडेकर व शुभम शिरवईकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्तरार्धात शुबर्ट बोर्जिस, मोहित सांतोडेकर व वालांको रॉड्रिग्ज यांच्या प्रत्येकी एका गोलसह एका स्वयंगोलचाही फादर आग्नेलच्या विजयात हातभार लागला.

म्हापशाच्या सेंट झेवियर्सने एस. एस. धेंपो महाविद्यालयास 2-1 फरकाने हरविले. विजयी संघासाठी संकल्प काणकोणकर व रोहित शिरोडकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. धेंपो महाविद्यालयाचा एकमात्र गोल नीरज कुर्टीकरने नोंदविला. विद्यापीठ मैदानावरील आणखी एका सामन्यात नावेली येथील रोझरी महाविद्यालयाने फर्मागुढीच्या पीईएस महाविद्यालयास 5-0 असे सहजपणे हरविले. शेल्डन फर्नांडिस व जोशुवा डिसिल्वा यांनी प्रत्येकी दोन, तर आर्नोल्डने एक गोल केला.

Father Agnel, Xavier's, Rosary in the quarterfinals
Goa News: स्वयंसहाय्य गटाला दिवाळीचे पदार्थ विकण्यास चिखली पंचायत सचिवाचा विरोध...

नावेली येथील रोझरी मैदानावर साखळी सरकारी महाविद्यालयाने डिचोलीच्या नारायण झांट्ये महाविद्यालयास 5-0 असे पराजित केले. आर्यन साळुंके, अमन रजब्बास, अजय खान, महंमद खान, ज्ञानेश्वर परब यांनी साखळीसाठी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

मिरामारच्या धेंपे महाविद्यालयाने मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयास 3-0 असे हरविले. अनिकेत, यज्ञेश दाभोळकर व जॉन्सन होर्ता यांनी प्रत्येकी एक गोल केला. नावेली मैदानावर झालेल्या आणखी एका सामन्यात खांडोळा सरकारी महाविद्यालयाने पर्वरीच्या विद्या प्रबोधिनी महाविद्यालयास 2-1 फरकाने नमविले. विद्या प्रबोधिनी संघाला महादेव नाईकने आघाडी मिळवून दिली, मात्र नंतर पुष्कर प्रभू आणि अमोल राऊळ यांच्या गोलमुळे खांडोळा महाविद्यालयाने बाजी मारली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com