आयएसएल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी ईस्ट बंगालविरुद्ध गोल नोंदविल्यानंतर जल्लोष करताना एफसी गोवा संघातील खेळाडू. Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एका मिनिटातील थरारनाट्यात एफसी गोवाची बाजी

एका गोलच्या पिछाडीवरून ईस्ट बंगालला नमविले, सलग तिसरा विजय

Akshay Nirmale

FC Goa in ISL Football: भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर एफसी गोवा संघाने एका मिनिटातील थरारनाट्यात बाजी मारली. या कालावधीत त्यांनी दोन गोल करून ईस्ट बंगालविरुद्ध पिछाडी भरून काढली आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

संदेश झिंगन व व्हिक्टर रॉड्रिगेझ यांनी अनुक्रमे ७४व्या व ७५व्या मिनिटास केलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवाने सामना २-१ फरकाने जिंकला. त्यापूर्वी नाओरेम महेश सिंग याने ४१व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे ईस्ट बंगाल संघ आघाडीवर होता.

एफसी गोवाचे आता लागोपाठच्या तीन विजयामुळे नऊ गुण झाले आहेत, तर ईस्ट बंगालला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचे चार गुण कायम राहिले.

नंदकुमार शेखरच्या पासवर महेश सिंग याला रोखणे एफसी गोवाच्या बचावफळीस शक्य झाले नाही. त्याला लाभ उठवत त्याने ईस्ट बंगालला विश्रांतीपूर्वी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या १६ मिनिटांतील खेळ बाकी असताना सामन्याचे पारडे फिरले.

व्हिक्टर रॉड्रिगेझच्या शानदार क्रॉसपासवर संदेश झिंगनचे हेडिंग भेदक ठरले आणि एफसी गोवाने बरोबरी साधली.

त्यानंतर पुढच्याच मिनिटास व्हिक्टरने स्वतः गोल केला, जो एफसी गोवासाठी निर्णायक ठरला. कार्लोस मार्टिनेझच्या असिस्टवर त्याचा डावा पायाचा फटका सुसाट ठरला.

दृष्टिक्षेपात...

  • यंदा आयएसएल स्पर्धेत सलग ३ सामने जिंकणारा एफसी गोवा संघ मोहन बागाननंतर दुसरा

  • आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे ईस्ट बंगालविरुद्ध ७ लढतीत ४ विजय

  • एफसी गोवाचे ईस्ट बंगालविरुद्ध सलग ३ विजय, गतमोसमात २-१ व ४-२ फरकाने विजय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT