Fastest 10000 Runs In T20 Cricket Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: बाबर आझमची शानदार कामगिरी, ख्रिस गेलचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड; किंग कोहलीला सोडले मागे

Fastest 10000 Runs In T20 Cricket Babar Azam: पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर बाबर आझमने T20 क्रिकेटचा सर्वात मोठा विश्वविक्रम केला आहे.

Manish Jadhav

Fastest 10000 Runs In T20 Cricket Babar Azam:

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर बाबर आझमने T20 क्रिकेटचा सर्वात मोठा विश्वविक्रम केला आहे. सर्वात तरुण आणि सर्वात जलद 10,000 टी-20 धावा करण्याचा विश्वविक्रम आता बाबर आझमच्या नावावर नोंदवला गेला आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2024 मध्ये पेशावर झाल्मीकडून फलंदाजी करताना बाबरने हा विश्वविक्रम केला.

विशेष म्हणजे, बाबरने आपल्या जुन्या फ्रँचायझी टीम कराची किंग्सविरुद्ध ही कामगिरी केली. बाबर आझमने (Babar Azam) कराची किंग्जविरुद्ध दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत टी-20 मधील 10,000 धावा पूर्ण केल्या. बाबरने मीर हमजाच्या आवडत्या कव्हर ड्राईव्हसह दोन धावा केल्या आणि 10,000 धावा पूर्ण केल्या.

दरम्यान, बाबर आझमने वयाच्या अवघ्या 29 वर्षे 129 दिवसांत ही कामगिरी केली. बाबरने आपल्या 271व्या टी-20 डावात ही कामगिरी केली. यापूर्वी, हा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. ख्रिस गेलने 285 टी-20 डावांमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. गेलने 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. तर विराट कोहलीने 299 टी-20 डावांमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

दुसरीकडे, T20 च्या इतिहासात 10,000 धावांचा टप्पा पार करणारा बाबर हा केवळ 13वा फलंदाज आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, शोएब मलिक, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली (Virat Kohli), ॲरॉन फिंच, रोहित शर्मा, जोस बटलर, कॉलिन मुनरो, जेम्स विन्स आणि डेव्हिड मिलर यांनी ही कामगिरी केली आहे.

टी-20 मध्ये सर्वात जलद 10,000 धावा करणाऱ्या बाबरनंतर ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. चौथ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने 303 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. यानंतर ॲरोन फिंचचा क्रमांक लागतो, ज्याने 327 डावांमध्ये ही कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT