KS Bharat | Rishabh Pant
KS Bharat | Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia: 'पंत लवकर ये!', KS Bharat कडून ती चूक होताच फॅन्सला आठवला ऋषभ, पाहा रिऍक्शन्स

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (9 मार्च) कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारताचा यष्टीरक्षक केएस भरतकडून एक चूक झाली. त्यानंतर चाहत्यांना ऋषभ पंतची आठवत झाली आहे.

झाले असे की प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेड यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. पण सहाव्या षटकात उमेश यादव गोलंदाजी करत असताना एक चेंडू 7 धावावंर खेळणाऱ्या ट्रेविस हेडच्या बॅटची कड घेत मागे गेला.

पण हा चेंडू झेलण्यास यष्टीरक्षण करत असलेल्या केएस भरतला अपयश आले. हा अगदी सोपा झेल होता. मात्र तो झेल भरतकडून सुटल्याने कर्णधार रोहित शर्माही निराश झाला होता.

तसेच यावेळी समालोचन करत असलेल्या सुनील गावसकर, रवी शास्त्री, मॅथ्यू हेडन यांनीही भरतवर टीका केली. त्यांनीही हा सोपा झेल असल्याचे म्हटले. तसेच दिनेश कार्तिकने भरत नर्व्हस असल्याचा अंदाज व्यक्त केला.

भरतकडून हा झेल सुटल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांना भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतची आठवण झाली. पंतने यापूर्वी कसोटीत अनेकदा यष्टीरक्षण करताना चांगले झेल घेण्याबरोबरच फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

मात्र, त्याच्या जागेवर भारतीय संघात संधी मिळालेल्या भरतला अद्याप फलंदाजीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यात विशेष कामगिरी करता आलेली नाही.

अश्विनने केला हेडचा अडथळा दूर

दरम्यान, भरतकडून झेल सुटल्यानंतर हेडला जीवदानाचा मोठा फायदा घेता आला नाही. त्याला आर अश्विनने 16 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या हातून झेलबाद केले. हेडने 44 चेंडूत 32 धावांची खेळी केली.

पंत भारतीय संघाची पहिली पसंती

पंत सध्या मोठ्या अपघातानंतर झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. त्याचा डिसेंबर 2022 अखेरीस कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला अनेक ठिकाणी दुखापती झाल्या. तसेच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे सध्या तो यातून सावरत आहे. त्याचमुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागत आहे. तो आता हे पूर्ण वर्ष क्रिकेट मैदानातून दूर राहण्याचीच शक्यता अधिक आहे.

महत्त्वाचे म्हणजे अपघातापूर्वी पंत यष्टीरक्षक म्हणून तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी भारतीय संघाची पहिली पसंत राहिला होता. पण आता तो संघात नसल्याने कसोटीसाठी केएस भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT