Rishabh Pant: स्वत: ब्रश करण्यातदेखील आनंद मिळतो; अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच बोलला

Rishabh Pant: मला आयुष्य जगण्यासाठी नवीन दृष्टीकोन मिळाला आहे.
Rishabh Pant
Rishabh Pantdainik gomantak

Rishabh Pant: क्रिकेटजगतात ऋषभ पंत स्टार विकेटकीपर म्हणून ओळखला जातो. 30 दिसंबर 2022ला ऋषभ पंतचा दिल्ली - डेहराडून भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर आता पहिल्यांदाच ऋषभने संवाद साधला आहे.

आता हळूहळू मला बरे वाटू लागले आहे. मला आशा आहे की मेडिकल टीमच्या सपोर्टने मी लवकरच पूर्णपणे बरा होईन. या अपघातानंतर मला आयुष्य जगण्यासाठी नवीन दृष्टीकोन मिळाला आहे. आता मी माझ्या आयुष्यातील एक एक क्षण जगत आहे.

आपण मोठी स्वप्नं पूर्ण करण्यात व्यस्त होऊन जातो पण आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी साजरा करण्याचे विसरतो असे ऋषभने म्हटले आहे. या अपघातानंतर माझ्या आयुष्यात बरेच काही बदलले आहे.

Rishabh Pant
IND vs AUS 3rd Test: कांगारुंच्या फिरकीने भारतीय बॅट्समनला नाचवले, तासाभरातच अर्धी टीम इंडिया गारद

मला लहान लहान गोष्टी समजत आहेत. स्वत: ब्रश करण्यात आणि उन्हात बसण्यातदेखील आनंद मिळतो.

मी क्रिकेट( Cricket )ला किती मिस करत आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे कारण माझं आयुष्यच क्रिकेटभोवती फिरतं असं ऋषभने म्हटले आहे.

त्याबरोबरच ऋषभ पंतने म्हटले आहे की मी नशीबवान आहे की माझ्यासाठी प्रार्थना करणारे चाहते मला मिळाले. त्याने त्याच्या चाहत्यांना भारतीय क्रिकेट टीम आणि दिल्ली कॅपिटल्सला सपोर्ट करण्याचे आवाहन केले आहे. मी बरा होऊन लवकरच परतण्याचा प्रयत्न करेन असे ऋषभने म्हटले आहे.

दरम्यान, भारत( India )- ऑस्ट्रेलिया यांची कसोटी मालिका सुरु असून या अपघातामुळे या मालिकेचा हिस्सा होऊ शकला नाही. ऋषभपंतचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे टेस्टमॅचमधील रेकॉर्ड उत्तम आहे. आता ऋषभ पंत पूर्णपणे बरा होऊन टीममध्ये कधी परतणार याची चाहत्यांना प्रतिक्षा असल्याचे दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com