Gautam Gambhir | MS Dhoni | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ सामन्यानंतर कोहलीचं कौतुक करताना गंभीरने साधला धोनीवर निशाणा?

Gautam Gambhir on Virat Kohli: न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने 95 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता, त्याबद्दल गंभीरने त्याचे कौतुक केले, मात्र त्याचे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir on Virat Kohli after India vs New Zealand Match in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना झाला. धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना झालेला हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. भारताचा हा या वर्ल्डकपमधील सलग पाचवा विजय ठरला.

भारताच्या या विजयात विराट कोहलीचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यामुळे त्याचे सध्या कौतुक होत आहे. त्याचे भारताचा माजी कर्णधार गौतम गंभीरनेही कौतुक केले आहे. मात्र, असे असले तरी आता त्याने विराटचे कौतुक करताना केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरताना दिसत आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराटने महत्त्वपूर्ण 95 धावांची खेळी केली. त्याने ही खेळी 104 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकरांच्या मदतीने केली.

दरम्यान, ही खेळी करताना त्याने श्रेयस अय्यरबरोबर (33) 52 धावांची, केएल राहुलबरोबर (27) 54 धावांची आणि रविंद्र जडेजाबरोबर 78 धावांची भागीदारी केली. त्यामुळे त्याने 274 धावांचा पाठलाग करताना दाखवलेली क्षमतेने अनेकांना प्रभावित केले आहे.

गंभीरने केलं विराटचं कौतुक, पण...

विराटच्या या खेळीचे स्टार स्पोर्ट्स चॅनलवर कौतुक करताना गंभीर म्हणाला, 'विराट कोहलीपेक्षा मोठा फिनिशर नाही. फिनिशर केवळ तेच नसतात, जे पाचव्या ते सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतात. विराट चेस मास्टर आहे.'

दरम्यान, गंभीरने विराटचे कौतुक करताना एमएस धोनीला फटकारलं का, असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला आहे. कारण धोनी त्याच्या कारकिर्दीत बऱ्याचदा पाचव्या क्रमांकाच्या खाली खेळायला आला आहे, तसेच तो क्रिकेटमधील एक सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही ओळखला जातो. त्यातच यापूर्वीही गंभीरने अनेकदा धोनीवर टीका केलेली आहे.

त्याचमुळे त्याने विराटचे कौतुक करताना धोनीवर निशाणा साधला का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर विराट भारताला विजयासाठी अवघ्या 5 धावा हव्या असताना बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने 48 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार खेचला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजा 39 धावांवर नाबाद राहिला.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मॅट हेन्री, मिचेल सँटेनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 273 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक 130 धावांची खेळी केली. त्याने 127 चेंडूत ही खेळी करताना 9 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच रचिन रविंद्रने 87 चेंडूत 75 धावांची खेळी केली.

तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT